Jowar Varieties Research : देगलूर तालुक्यातील डॉ. अंबिका मोरे यांनी ज्वारी वाण संशोधनात राष्ट्रीय पातळीवर कसा उमटवला ठसा?

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत एकमेव महिला ज्वारी पैदासकार अशी ओळख डॉ. अंबिका मोरे यांनी मिळवली आहे. राष्ट्रीय स्तरावर शास्त्रज्ञ म्हणून त्यांना गौरविण्यात आले आहे. अविरत संशोधनातून त्यांनी ज्वारीचे विविध वैशिष्ट्यपूर्ण वाण विकसित केले. शेतकऱ्यांत ते लोकप्रिय झाले आहेत.
Jowar Varieties Research
Jowar Varieties ResearchAgrowon

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत (Vasantrao Naik Marathwada Agriculture University) कार्यरत ज्वारी संशोधन केंद्र Jowar Varieties Research) प्रसिद्ध पावले आहे. येथे कार्यरत एकमेव महिला पीक पैदासकार अशी डॉ. अंबिका मोरे यांची ओळख आहे.

कोकलगाव (ता. देगलूर. जि. नांदेड) हे त्यांचे मूळगाव. परभणी येथून एम.एस्सी. (कृषी वनस्पतिशास्त्र) ही पदवी त्यांनी घेतली. सन २००८ मध्ये विद्यापीठातील भाजीपाला संशोधन योजनेंतर्गत वरिष्ठ संशोधन सहायक म्हणून त्यांची निवड झाली.

आठ महिन्यांनंतर ज्वारी संशोधन केंद्रात सहाय्यक पैदासकार म्हणून त्या रुजू झाल्या. जनुकीय शास्त्र व वनस्पती पैदास (जेनेटिक्स ॲण्ड प्लॅन्ट ब्रीडिंग) या विषयातून त्यांनी पीएचडी मिळवली.

सन २००८ ते २०२० या कालावधीत पीक पैदासकार म्हणून त्यांनी ज्वारीचे विविध वाण विकसित केले. सध्या त्या कृषी वनस्पती शास्त्र विभागात सहायक प्राध्यापक आहेत.

Jowar Varieties Research
Jowar Market : परभणी जिल्ह्यातील बाजार समित्यांत ज्वारीची कमी आवक

डॉ. अंबिका यांचे संशोधन

ज्वारी संशोधन केंद्राने आजवर खरीप ज्वारीचे चार सरळ वाण, दोन संकरित, रब्बी ज्वारीचे चार सरळ आणि दोन हुरडा वाण असे १२ वाण विकसित केले. मराठवाडा, राज्य व देशपातळीवर ते प्रसारित झाले.

त्यापैकी डॉ. अंबिका यांनी विकसित केलेल्या खरीप व रब्बी ज्वारीच्या प्रत्येकी दोन, एक हुरडा आणि चारा ज्वारीचा एक आदी वाणांचा समावेश आहे. उदाहरण द्यायचे तर एसपीएच १६४१, परभणी शक्ती, परभणी सुपर मोती, परभणी वसंत, सीएसव्ही ४० एफ आदी वाण राज्यातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय झाले आहेत.

किडी-रोगांना सहनशील, लोह, जस्त आदी खनिजद्रव्यांनी परिपूर्ण, धान्य, हुरडा, कडबा उत्पादनात सरस आदी गुणवैशिष्ट्ये असलेले हे वाण खरीप, रब्बी हंगामासाठी अनुकूल आहेत.

त्यातून धान्य, चाऱ्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासह प्रति एकरी उत्पादकता वाढवणे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे. संशेधनात इक्रिसॅट या आंतरराष्ट्रीय संस्थेचीही मदत झाली आहे. केंद्राच्या प्रक्षेत्रावर लाल, पिवळी ज्वारी, हुरडा, चारा आदी वाणांच्या चाचण्याही सुरू आहेत.

Jowar Varieties Research
Jowar Processing : पौष्टिक ज्वारी पासून बनतात विविध पदार्थ

कामांतील समर्पण

डॉ. अंबिका यांचे पती आशिष जाधव अन्न तंत्रज्ञान विषयातील ‘एम.टेक.’ असून, परभणी येथील राजीव गांधी अन्नतंत्र महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. दांपत्यास जुई आणि आरोही या मुली असून, त्या शालेय शिक्षण घेत आहेत.

डॉ. अंबिका कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून संशोधकाचे हे कर्तव्य नेटाने पार पाडत असतात. वाणांच्या चाचण्या सुरू असतात त्या वेळी पेरणी, परागीभवन अवस्था, काढणी अशा विविध टप्प्यांमध्ये रविवार किंवा सणवार आले तरी सुट्टी घेता येत नाही. अशावेळी मुलींना सांभाळण्यासह घरातील कामे पार पाडण्यात घरच्यांची साथ महत्त्वाची ठरते.

कुलगुरू डॉ. इंद्रमणी, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, प्रभारी अधिकारी डॉ. एल. एन. जावळे, ज्वारी संशोधन केंद्राचे तत्कालीन प्रभारी अधिकारी व पैदासकार डॉ. एस. एस. अंबेकर, डॉ. एस. पी. म्हेत्रे, डॉ. एच. व्ही. काळपांडे, डॉ. कमलाकर कांबळे यांचे मार्गदर्शनही लाभल्याने वाटचाल सुकर होते.

सन्मान

शेतकरी मेळाव्यांच्या माध्यमातून नवे वाण, लागवड ते काढणीपश्‍चात, मूल्यवर्धनापर्यंत तंत्रज्ञान प्रसारातही डॉ. अंबिका मागे नसतात. ‘इक्रिसॅट’च्या मदतीने तेलंगणा, छत्तीसगड राज्यांपर्यंत परभणी सुपर मोती वाण पोहोचला आहे.

कृषी वनस्पतिशास्त्र सोसायटीतर्फे सर्वोत्कृष्ट युवा संशोधक व राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट महिला शास्त्रज्ञ पुरस्कार मिळाला आहे. पन्नासपर्यंत शोधनिबंध राष्ट्रीय व आंतररराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असून, ‘ॲग्रोवन’सह अन्य वृत्तपत्रांत ४० हून लेख प्रकाशित आहेत.

डॉ. अंबिका मोरे ९७६४०२२५३३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com