Farmer Protest On Onion Rate : कांद्याला भाव द्या अन्यथा... संतप्त शेतकऱ्यांनी अडवला मुंबई ते आग्रा महामार्ग

Onion Producer Protest : अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. दरम्यान कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
Onion Rate Update
Onion Rate UpdateAgrowon

Onion Pune News : अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. दरम्यान कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अचानक कांदा दरात घसरण झाल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत.

मुंबई ते आग्रा महामार्गावर कांदे फेकत शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे. मालेगावच्या मुंगसे बाजार समिती समोर हा प्रकार घडल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

Onion Rate Update
Onion Market Rate : महाराष्ट्र सरकारला जमलं नाही ते तेलंगणा सरकारने केले, हैद्राबाद येथे कांद्याला चढे भाव

काबाड कष्ट करून चांगला पिकवला तरी योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी थेट नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील मुंगसे उपबाजार समिती समोर असलेल्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर कांदे फेकून देत संताप व्यक्त केला.

बाजार समितीत झालेल्या लिलावात कवडीमोल भाव आल्याने शेतकऱ्यांनी थेट रस्त्यावर कांद्याने भरलेली वाहने उभी करत कांदे रस्त्यावर फेकून दिली. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. अतिवृष्टी, गारपीट यामधून कसाबसा बाहेर पडणारा शेतकरी कांद्याला भाव नसल्याने पुन्हा हतबल झाला आहे.

मागच्या महिन्यांपासून झालेल्या अवकाळी पावसाचा नाशिक जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या कांदाचे मोठे नुकसान झाले होते. पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्याचा मोठा फटका कांद्यासह इतर पिकांना बसला होता.

दरम्यान नाशिक आणि जळगावमधील फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. या फटक्यातून शेतकरी सावरत असतानाच आता कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com