Minister Radhakrishna Vikhe Patil: पीक पद्धतीत बदलासाठी सरकार सकारात्मक

अवकाळीचे सततचे संकट लक्षात घेता त्यासाठी उपाययोजना म्हणून शेती व पीक पद्धतीमध्ये बदलासाठी सरकार सकारात्मक आहे.
Minister Radhakrishna Vikhe
Minister Radhakrishna Vikhe Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : अवकाळीचे सततचे संकट लक्षात घेता त्यासाठी उपाययोजना म्हणून शेती व पीक पद्धतीमध्ये बदलासाठी सरकार सकारात्मक आहे.

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे आहे. त्यातून मार्ग निघेलच असे विधान राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी (ता. २६) रात्री सोयगाव येथे केले.

सोयगाव येथे प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय, उपविभागीय अधिकारी कुलदीप जंगम, तालुका प्रमुख प्रभाकर काळे, तहसीलदार रमेश जसवंत, गटविकास अधिकारी प्रकाश नाईक आशाबी तडवी उपस्थित होते.

Minister Radhakrishna Vikhe
Nagar Crop Damage : नुकसान पाहणीसाठी विखे-थोरातांची चढाओढ

श्री. विखे पाटील म्हणाले, की सोयगाव हा देशातील एकमेव १२० कि.मी. लांबीच्या ऐतिहासिक तालुका आहे. या तालुक्यात केंद्र शासनाच्या आंतरराष्ट्रीय मानांकन मिळालेली जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आहे. अजिंठा लेणी ही सोयगावसाठी पर्यटनाच्या संधी उपलब्ध करून देणारी सर्वांत मोठी संधी आहे.

त्या दृष्टीने राज्य सरकार प्रयत्नशील आहे. केंद्राच्या कौशल्य विकास उपक्रमातून औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रास्ताविक केले.

दानवे म्हणाले, की मराठवाड्यात १२० वंदे भारत रेल्वे सुरू करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. या वंदे भारत रेल्वेचे लातूरला काम सुरू झाले आहे. मराठवाड्यात रेल्वेचे जाळे विणण्याचे काम सुरू असून, जालना-जळगाव या रेल्वेच्या कामाला आता निती आयोगाने मान्यता दिली.

कॅबिनेटची मंजुरी मिळताच हे काम सुरू होणार. सिल्लोड सोयगाव रेल्वेला जोडणी करण्यासाठी जालना-जळगावनंतर सोयगावच्या सीमेवरून जाणारी पाचोरा-जामनेर या लाइनला ब्रॉड गेजची मान्यता मिळाली आहे. मनमाड-नांदेड या मार्गासाठी केंद्राकडून ९६० कोटी रुपये मिळाले आहेत.

घरकुल लाभार्थ्यांना ५० ब्रास वाळू...

येत्या १ मेपासून राज्यात ६०० रुपये ब्रासने, तर घरकुल लाभार्थ्यांना ५० ब्रास वाळू मोफत मिळणार आहे. त्यासाठी संबंधित तहसीलदार यांना एक विनंती अर्ज करणे आवश्यक आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com