Jaljeevan Mission : ‘जलजीवन मिशन’च्या कामाचा दर्जा चांगला ठेवा

जी कामे सुरू होणार आहेत ती आता पासूनच चांगल्या दर्जाची होतील, याकडे लक्ष द्या. स्थानिक लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन काम करा.
Water Scheme
Water SchemeAgrowon

Solapur News : जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेच्या (Jaljeevan Mission Scheme) कामासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. ठेकेदारांमार्फत कामाचा दर्जा चांगला ठेवा, अशा सूचना पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, दुग्ध व पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे (Minister Radhakrishna Vikhe Patil) पाटील यांनी दिल्या.

सोलापूर जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामाची आढावा बैठक लक्ष्मी विष्णू मिल कपाउंडमधील आत्मा व कृषी विभागांतर्गत कृषी प्रदर्शनाच्या ठिकाणी घेण्यात आली.

या बैठकीस आमदार सुभाष देशमुख, आमदार संजय शिंदे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आयुक्त शीतल उगले- तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, अधीक्षक अभियंता संजय माळी, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड उपस्थित होते.

Water Scheme
Jaljeevan Mission : ‘जलजीवन’ला प्राधान्य द्या

पालकमंत्री विखे-पाटील म्हणाले, ‘‘जलजीवन मिशनच्या कामात अनियमितता झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा स्थितीत केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी योग्य होणे अपेक्षित आहे.

सध्या पाइपचा दर्जा चांगला नसल्याबाबत आमदारांच्या तक्रारी आहेत. याबाबत पाइप चांगल्या दर्जाचे वापरा, निविदा प्रक्रिया राबविताना ठेकेदारांना झुकते माप देऊन नियम वापरण्यात आले, याचा सविस्तर आढावा पुढच्या बैठकीत घेण्यात येईल.

जी कामे सुरू होणार आहेत ती आता पासूनच चांगल्या दर्जाची होतील, याकडे लक्ष द्या. स्थानिक लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन काम करा,’’ असेही त्यांनी सांगितले.

आमदार देशमुख यांनी निविदा प्रक्रिया राबविताना अनियमितता केली असल्याचे सांगितले. जे ठेकेदार नियमित काम करीत नाहीत, अशा ठेकेदारांबाबत तक्रार असूनही कामे देण्यात आली. संबंधित ठेकेदार यांच्या निविदा मंजूर करण्यात आल्या.

Water Scheme
Jaljeevan Mission : 'जलजीवन मिशन' योजनेत काय झाला आहे गैरव्यवहार?

याबाबत आक्षेप असल्याचे सांगितले. आमदार शिंदे यांनी चार वर्षांतील पाणीपुरवठा व बांधकाम विभागातील अपूर्ण कामे ठेवणारे ठेकेदार यांच्यावर कारवाई करा. त्यांना पुन्हा कामे देऊ नका, यामुळे योजनेवर परिणाम होत असल्याचे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com