Kasaba by-election Result 2023 : भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची मुसंडी; कसबा पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का

राज्यात भाजपची सत्ता असताना भाजपचा पराभव झाला. तसेच शिंदे गट व मनसेचा पाठिंबा असतानाही भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे.
Ravindra Dhangekar
Ravindra DhangekarAgrowon

Kasaba Election Result : कसबा मतदारसंघातील पोटनिवडणूकीमध्ये महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा दणदणीत विजय झाला. २८ वर्षांनंतर पहिल्यांदाचा भाजपला कसबा मतदार संघात पराभवाला समोरे जावं लागलं. भाजपचे उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) यांचा पराभव झाला.

या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार धंगेकर यांना ७३ हजार १९४ हजार मतं मिळाली. तर भाजपचे उमेदवार रासने यांना ६२ हजार २४४ मतं मिळाली.

राज्यात भाजपची सत्ता असताना भाजपचा पराभव झाला. तसेच शिंदे गट व मनसेचा पाठिंबा असतानाही भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे भाजपाच्या गोटात खळबळ उडाली आहे.

Ravindra Dhangekar
Pune By Election Result: कसबा, चिंचवडमध्ये आज मतमोजणी

पहिल्या फेरीपासूनच काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आघाडीवर होते. त्यांनी एकाही फेरीत भाजपच्या हेमंत रासने यांना लीड मिळू दिली नाही. धंगेकरांनी प्रत्येक फेरीत दीड ते दोन हजारांची लीड घेतली. त्यानंतर त्यांनी पाचव्या फेरीपासून पाच हजारांची लीड घेतली.

त्यानंतर त्यामध्ये लीड वाढतच राहिली. शेवटी १९व्या आणि शेवटच्या फेरीत त्यांनी ११ हजार ४० मतांची आघाडी घेत हेमंत रासने यांना पराभूत केले. शेवटच्या फेरीत रवींद्र धंगेकर यांना ७३ हजार १९४ मते मिळाली. तर हेमंत रासने यांना ६२ हजार २४४ मते मिळाली.

कसबा मतदार संघातील भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे आजाराने निधन झाले. त्यामुळे कसबा मतदार संघात पोटनिवडणूक घेण्यात आली. कसबा हा भाजपचा पारंपारिक मतदार संघ समजला जात होता.

Ravindra Dhangekar
‘कसबा सांगाव’ची गाय; ‘गडहिंग्‍लज’च्या म्‍हशीने मारली बाजी; ‘गोकुळ श्री’ स्पर्धेा

१९९१ नंतर कसबा मतदार संघात भाजपचे नेते गिरीश बापट यांनी वर्चस्व कायम राखलं होतं. गिरीश बापट खासदार झाल्यानंतर भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनीही कसबा मतदार संघ टिकून ठेवला होता. त्यामुळे या पोटनिवडणुकीतील पराभव भाजपाला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्या विजयानंतर कसबा मतदार संघात मोठ्या जल्लोषात महिला आणि पुरुषांनी आनंद साजरा केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com