Crop Damage : सुधागडमध्ये अवकाळीचा फटका

आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत. तालुका कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत सहा गावांतील सहा हेक्टरवरील आंबापिकाचे नुकसान झाले आहे.
Mango Production
Mango ProductionAgrowon

Pali News : सुधागड तालुक्यात दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण (Cloudy Rain) आणि सोमवारी (ता. ६) आलेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) आंबापिकाला चांगलाच फटका (Mango Crop Damage) बसला आहे. यामुळे मोहरांनी बहरलेले व काही ठिकाणी कैऱ्या धरलेले आंबापिक पूर्णत: धोक्यात आले आहे.

यामुळे आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत. तालुका कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत सहा गावांतील सहा हेक्टरवरील आंबापिकाचे नुकसान झाले आहे.

यावर्षी आंब्याला चांगला मोहर आला होता. शिवाय, बऱ्याच ठिकाणी आता कैऱ्यादेखील आल्या होत्या; मात्र अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

Mango Production
Mango Fruit Fall : तापमानवाढीमुळे रत्नागिरीत फळ भाजण्यासह गळती

जिल्ह्यातील आंबा पिकांवर अवकाळी पाऊस व हवामानातील बदल आदींबाबत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान टाळण्यासाठी आंबा पीक विमा योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी आंबा बागायतदारांकडून केली जात आहे. आंब्याप्रमाणेच भाजीपाला फळांवरही ढगाळ वातावरणाचा परिणाम झाला आहे.

या वर्षी आंबापीक बहरल्याने चांगले उत्पन्न हाती येईल, अशी अपेक्षा परिसरातील बागायतदारांची होती. परंतु नैसर्गिक बदलामुळे आता अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बागायतदारांना बदलत्या हवामानाचा व अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारने नुकसान भरपाई द्यावी.
संजय घोसाळकर, आंबा बागायतदार, पाच्छापूर
सहा गावांचा अहवाल आला आहे. बारा बागायतदारांचे अंदाजे सहा हेक्टर आंबापिकाचे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाची माहिती शेतकरी व बागायतदारांना देतो. ज्यांचे कोणाचे नुकसान झाले आहे त्यांनी कृषी विभागाकडे संपर्क साधावा.
जे. बी. झगडे, तालुका कृषी अधिकारी सुधागड

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com