
Nashik News : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक (Nashik Market Committee Election) प्रचारावरून भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनेलचे नेते शिवाजी चुंभळे यांनी थेट महाविकास आघाडीचे आमदार हिरामण खोसकर (MLA Hiraman Khoskar) यांना मोबाईलवरून धमकी दिल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात शिवाजी चुंभळे यांच्यासह त्यांचे पुत्र अजिंक्य चुंभळे यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.
नाशिक कृषी बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप-शिवसेना शिंदे गट असे चित्र असले, तरी खरी लढत पिंगळे गट विरुद्ध चुंभळे गट अशी पारंपरिकच होणार आहे.
महाविकास आघाडीमुळे आमदार हिरामण खोसकरदेखील पिंगळे गटासोबत प्रचार यंत्रणेत सहभागी झाले आहेत. त्याचा राग मनात धरून भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनेलचे नेते शिवाजी चुंभळे यांनी खोसकर यांना मोबाईलवरून ठार करण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे.
त्याचबरोबर चुंभळे यांचे पुत्र अजिंक्य यांनीदेखील खोसकरांना धमकी दिली आहे. वेळोवेळी धमकी दिली जात असल्याचे खोसकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
चुंभळे म्हणताय, यामागे राजकारण...
यामागे राजकारण आहे, अशा कुठल्याही प्रकारची धमकी आम्ही आमदार खोसकर यांना दिलेली नाही. आमच्या गटाला मदत करावी यासाठी त्यांना माझा मुलगा फोनवरून सांगत होता. मात्र त्यांनी चुकीची तक्रार केली आहे.
आम्ही यासंबंधी पोलिस स्टेशनला झालेले संभाषण सादर केलेले आहे, असे शिवाजी चुंभळे यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.