Dada Bhuse
Dada BhuseAgrowon

Chemical Fertilizer : रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी प्रयत्नांची गरज

Organic Fertilizers : शेतीत सेंद्रिय खतांचा वापर वाढून रासायनिक खतांचा वापर कमी करण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत जनजागृतीसह प्रचार, प्रसार व सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे.

Nashik News : शेतीत सेंद्रिय खतांचा वापर वाढून रासायनिक खतांचा वापर कमी करण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत जनजागृतीसह प्रचार, प्रसार व सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सोमवार (ता.८) रोजी जिल्हास्तरीय खरीप हंगाम-२०२३ नियोजन बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार, डॉ.राहुल आहेर, सरोज अहिरे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Dada Bhuse
Kharif Season : खरीप हंगामात सोयाबीन लागवडीकडे कल

मंत्री भुसे म्हणाले, की यावर्षी ६.२७ लाख हेक्टर क्षेत्र हे खरीप हंगामासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. या क्षेत्रानुसार साधारणत: सोयाबीन वगळता ६८ हजार ८६३ क्विंटल विविध पिकांच्या बियाणे आणि २ लाख ६० हजार टन रासायनिक खतांची आवश्‍यकता असल्याने या उपलब्धतेच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत नियोजन करण्यात यावे.

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्जाची उपलब्धता झाली पाहिजे. युरिया पुरवठा धारकांनी लिंकींगबाबत कृषी विभागाशी योग्य समन्वय साधावा. सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळेल यादृष्टीने आर्थिक पाठबळ उपलब्धतेच्या दृष्टीने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तरतूद करण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात यावेत.

यासोबत जिल्हाधिकारी, कृषी व इतर शासकीय कार्यालयांच्या आवारात शेतकऱ्यांचा सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला शेतीमाल विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांचा शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्यात नक्कीच मदत होणार आहे.

त्यादृष्टीने कृषी विभागाने शासकीय कार्यालयांच्या आवारातील स्थळे निश्चित करावीत, असेही पालकमंत्री भुसे यांनी यावेळी सांगितले.

येणाऱ्या काळात सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून पिकविलेल्या शेतमालास बाजारपेठ उपलब्ध झाल्याच निश्चितच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यास हातभार लागेल, अशी आशा विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केली.

Dada Bhuse
Compost Making : तंत्र कंपोस्ट खत निर्मितीचे...

धरणातील गाळ काढण्याच्या प्रस्तावांना तातडीने मंजुरीसाठी अधिकाऱ्यांना सूचित करण्याबाबत झिरवाळ यांनी बैठकीत सांगितले.

या अधिकाऱ्यांचा झाला सत्कार

तालुका कृषी अधिकारी मालेगाव बाळासाहेब व्यवहारे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी जयंत गायकवाड, विश्वास बर्वे, लितेश येळवे, तंत्र सहाय्यक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीतम खैरनार, कृषी सहाय्यक शरद वाघ, तंत्र सहाय्यक धनश्री सूर्यवंशी, नांदगाव कृषी पर्यवेक्षक राजेंद्र काळे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com