Pandharpur Chaitri Vari : चैत्री वारी दोन दिवसांवर, पंढरीत वारकऱ्यांची वर्दळ

गेल्या वर्षापासून कोरोनानंतर निर्बंधमुक्त वातावरणात वारी सोहळा होत आहे. यंदाही वारीसाठी वारकऱ्यांची सर्वाधिक गर्दी दिसत आहे.
Vitthal- Rukmini Temple
Vitthal- Rukmini TempleAgrowon

Pandharpur News : येत्या रविवारी (ता.२) पंढरपुरात चैत्री वारीचा सोहळा साजरा होत असून, ही वारी अवघ्या दोन दिवसांवर आल्याने राज्यभरातून वारकऱ्यांची वर्दळ पंढरपुरात वाढली आहे.

विशेषतः मंदिर व नगरप्रदक्षिणा मार्गासह चंद्रभागा (Chandrbhaga) वाळवंटात वारकऱ्यांची अधिक गर्दी आहे. सर्वत्र टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने वारीचा उत्साह दाठलेला दिसत आहे.

गेल्या वर्षापासून कोरोनानंतर निर्बंधमुक्त वातावरणात वारी सोहळा होत आहे. यंदाही वारीसाठी वारकऱ्यांची सर्वाधिक गर्दी दिसत आहे. आषाढ, कार्तिक, माघी या प्रमुख तीन वाऱ्यांसह चैत्री वारीला विशेष महत्त्व आहे.

रविवारी (ता.२) चैत्री वारीचा मुख्य सोहळा होणार असून, उद्याच्या शनिवारी (ता.१) दशमीच्या स्नानाचे पर्व गाठण्यासाठी वारकऱ्यांची रेलचेल शुक्रवारपासूनच वाढलेली आहे. काही भागातील पालख्या-दिंड्यांचे आगमन पंढरपुरात होत आहे.

Vitthal- Rukmini Temple
APMC Election : पंढरपूर, अकलूज, सांगोल्यासह आठ बाजार समित्यांची निवडणूक जाहीर

शहरातील विविध मंदिरे, धर्मशाळा, मठ आदीठिकाणी भजन, कीर्तन आणि प्रवचने रंगली आहेत. मंदिर परिसर, नगरप्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, एस.टी स्थानकासह चंद्रभागेतील वाळवंटात वारकऱ्यांची सर्वाधिक गर्दी आहे.

मंदिर समितीने सध्याच्या वाढत्या ऊनाच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी मंदिर परिसरात शेडनेटचे छत टाकले आहे.

महिला वारकऱ्यांची संख्या वाढणार

मंदिर समितीने दर्शनरांगेतील वारकऱ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही दशमी ते द्वादशी दरम्यान खिचडी, लिंबूसरबत, ताक, मठठा याची मोफत सोय केली आहे. तसेच नित्यनेमाने अकोला येथील श्री गजानन सेवा संघाच्या १७५ स्वयंसेवकाच्या माध्यमातून मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, व पत्राशेड दर्शनरांगेची स्वच्छता करण्यात येत आहे.

सध्या दर्शनरांगेतून दर्शनासाठी तीन ते चार तास लागत आहेत. नुकतेच राज्य शासनाने महिलांना एस.टी.बसमध्ये ५० टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे यंदाच्या वारीसाठी महिला वारकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com