Natural Disaster : नैसर्गिक आपत्तीविषयी कार्यशाळांचे आयोजन करा : जिल्हाधिकारी

Natural Disaster In Satara : नैसर्गिक आपत्तीविषयी लोकांमध्ये जनजागृती करून दरडीसारख्या आपत्तीपूर्वी होणाऱ्या बदलांची माहिती लोकांना द्यावी.
Natural Climate
Natural ClimateAgrowon

Satara News : नैसर्गिक आपत्तीविषयी लोकांमध्ये जनजागृती करून दरडीसारख्या आपत्तीपूर्वी होणाऱ्या बदलांची माहिती लोकांना द्यावी. याबाबत कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी (Collector Ruchesh Jayavanshi) यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मॉन्सूनपूर्व तयारी २०२३ आढावा बैठक संपन्न झाली. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्‍वर खिलारी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे यांच्यासह जिल्ह्यातील संबंधित विभागांचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Natural Climate
Manipur Landslide : मणिपुरात दरड कोसळून सहा जणांचा मृत्यू

दरड कोसळण्यापूर्वी पाणी गढूळ होणे, जमिनीला भेगा पडणे, झाडे व खांब वाकणे अशी लक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे दिसल्यास ग्रामस्थांनी गाव सोडावे, असे सांगून जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले, ‘‘दरडप्रवण गावांच्या पुनर्वसनासाठी भूसंपादनाची प्रक्रिया लवकरात लवकर राबवावी. सिंचन मंडळांकडील जमिनींचा प्रस्ताव तातडीने पाठवावा.

सर्व विभागांकडील नियंत्रण कक्ष २४ तास नियमितपणे सुरू राहतील याची दक्षता घ्यावी. शासनाकडून प्राप्त झालेले सॅटेलाइट फोन पाटण व महाबळेश्‍वर तालुक्यात प्राधान्याने पुरविण्यात यावे. जलसंधारण विभागाने तलाव फुटून नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी.

नदी काठावरील शेतीपंप काढून घेण्याबाबत सूचना द्याव्यात. पाटबंधारे विभागाने आपत्ती व्यवस्थापनासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती द्यावी. पोलिस विभागाने पुरामुळे पूल पाण्याखाली गेल्यास दोन्ही बाजूस पोलिस तैनात करावेत.

मॉन्सून काळात नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होईल याकडे मुख्याधिकारी व गट विकास अधिकारी यांनी लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांनी सर्व विभागांनी आपत्ती व्यवस्थापनाचा सर्वसमावेशक आराखडा २० मेपर्यंत सादर करण्याच्या सूचना दिल्या.

श्री. ताम्हाणे म्हणाले, जिल्ह्यात १७२

पूरप्रवण गावे असून, ६ घाटांमध्ये दरड कोसळते. ५०० स्वयंसेवकांना आपत्ती प्रशिक्षण देण्यात आले असून, स्थलांतरासाठी ४७ तात्पुरती शेल्टर उभारली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com