Chana Market : परभणी, हिंगोलीतील हरभऱ्याची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी

प्रति क्विंटल मागे ८०० ते १२०० रुपयांचा फरक
Chana Market
Chana MarketAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
परभणी ः परभणी-हिंगोली जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार (APMC) समित्यामध्ये यंदाच्या हंगामातील हरभऱ्याची आवक (Chana Arrival) सुरू झाली आहे. व्यापारी हमीभावाच्या तुलनेत क्विंटलमागे ८०० ते १२०० रुपयांच्या फरकाने खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.


केंद्र शासनाने यंदाच्या वर्षासाठी हरभऱ्याची किमान आधारभूत (Chana MSP) किंमत प्रतिक्विंटल ५३३५ रुपये एवढी निश्‍चित केली आहे. परंतु परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील कृषी उत्पन्न बाजार समित्या तसेच अन्य ठिकाणच्या व्यापाऱ्यांकडून हरभऱ्याची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केली जात आहे.

मंगळवारी (ता. २८) परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याची ९०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ४४०० ते कमाल ४५०० रुपये, तर सरासरी ४४५० रुपये दर मिळाले.

जिंतूर बाजार समितीत हरभऱ्याची ११२ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४५०० ते कमाल ४५६८ रुपये तर सरासरी ४५०६ रुपये दर मिळाले.

Chana Market
मक्याची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी

हिंगोली बाजार समितीत हरभऱ्याची ११५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४१९९ ते कमाल ४६४५ रुपये, तर सरासरी ४४२२ रुपये दर मिळाले.

वसमत बाजार समितीत सोमवारी (ता. २७) हरभऱ्याची ४०७ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ४४६० ते कमाल ४६६५ रुपये तर सरासरी ४५८२ रुपये दर मिळाले.

सेनगाव बाजार समितीत हरभऱ्याची १८० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४२५० ते कमाल ४५०० रुपये, तर सरासरी ४३०० रुपये दर मिळाले.


यंदा परभणी जिल्ह्यात १लाख ७२ हजार ७९३ हेक्टर हिंगोली जिल्ह्यात १ लाख ३८ हजार ८७७ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झालेली आहे.

विविध कारणांमुळे हरभऱ्याची उत्पादकता कमी येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत उत्पादन खर्च वाढला आहे. त्यातुलनेत हमीभाव देखील कमीच आहे. व्यापारी हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Chana Market
Chana Rate : हरभऱ्याचे दर हमीभावापेक्षा कमी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com