Crop Damage : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर फक्त आश्वासनांचा पाऊस

खासदार, आमदार, मंत्री, अधिकारी आले. पंचनामे करण्याचे आदेश दिले पण नुकसानभरपाई किती व कधी मिळेल याचा खुलासा कोणीही केला नाही.
Crop Damage Compensation
Crop Damage Compensation Agrowon

Nephad News : निफाड तालुक्यातील रानवड, पंचकेश्वर, कुंभारी,रानवड यासह अनेक गावातील कांदा (Onion) व द्राक्ष उत्पादक (Grape Producer) शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. उराशी बाळगलेले हिरवे स्वप्न धुळीस मिळाले आहे.

खासदार, आमदार, मंत्री, अधिकारी आले. पंचनामे करण्याचे आदेश दिले पण नुकसानभरपाई किती व कधी मिळेल याचा खुलासा कोणीही केला नाही.

लाखो रुपये खर्च केलेले भांडवल वाया गेले आहे. काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने उत्पन्न बुडाले आहे. आता फक्त प्रतीक्षा नुकसान भरपाईची शेतकऱ्यांचे कोणीच वाली नाही बघता बघता गारा झाल्या वारा झाला अन् आश्वासनाचा पाऊसही झाला.

Crop Damage Compensation
Crop Damage Compensation : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना दोन दिवसांत आर्थिक मदत

निफाड तालुक्यात द्राक्ष, कांदा, गहू, मका अशी अनेक नगदी पिके घेतली जातात जास्तीचा आर्थिक फायदा करून देणारे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर भांडवल खर्च करावा लागतो. अवकाळी पावसाने निफाड तालुक्यात धुमाकूळ घातला होता.

सारं होत्याचं नव्हतं झालं तालुक्यातील कुंभारी, देवपूर, पंचकेश्वर, रानवड, वनसगाव, खडकमाळेगाव यासह अनेक गावात गारपीट झाली. सर्व शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक शेतकरी खर्च कसा भरून काढायचा या विवंचनेत आहे.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, आमदार दिलीप बनकर माजी आमदार अनिल कदम यांनी शेतकऱ्यांचे सांत्वन केले. यासह खासदार विनायक राऊत हेही बांधावर येऊन पाहणी करून गेले. अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेशही दिले.

निफाडच्या प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे यांनीही नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांना आता मदतीची प्रतीक्षाच करावी लागणार हे नक्कीच. मदत लवकर मिळावी अशी मागणी कांदा, द्राक्ष उत्पादक शेतकरी करत आहे.

Crop Damage Compensation
Crop Damage Compensation : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना दोन दिवसांत आर्थिक मदत
२००६ पासून अनेकदा जिल्ह्यात गारपीट झाली. महसूल व कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे ही केले आहेत. मात्र, नुकसान भरपाईची रक्कम अतिशय तोकडी हातात मिळते. द्राक्षांसाठी पूर्वीपेक्षा वेगळा निकष लावून नुकसान भरपाई मिळायला हवी. द्राक्ष उत्पादकांना भरघोस मदत देऊन दिलासा द्यावा.
राजेंद्र बोरगुडे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, निफाड तालुका

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com