Sangli Apmc Election : सांगलीत बाजार समितीसाठी आघाडी की स्वबळावर लढती?

सांगली बाजार समितीत आघाडी होणार की स्वंत्रत निवडणूक लढवणार याबाबत अद्याप चर्चा सुरू झाल्या नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्वबळावर की आघाडी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sangli APMC Election News
Sangli APMC Election NewsAgrowon

Sangli News : सांगली बाजार समितीसह शिराळा, पलूस, विटा, तासगाव, आटपाडी आणि इस्लामपूर या बाजार समितीत निवडणूक लढवण्यासाठी मातब्बर नेत्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

त्यामुळे सात बाजार समितीत स्थानिक आघाड्या, एक हाती सत्ता आणण्यासाठी राजकीय खेळी सुरू झाल्या आहेत. त्यातच तासगाव बाजार समितीत आबा-काका गटात सामना होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे बाजार समितीत सत्ता कायम आणि काबीज करण्यासाठी आतापासूनच राजकीय जुलवाजुळव सुरू झाल्या आहेत.

सांगली बाजार समितीत आघाडी होणार की स्वंत्रत निवडणूक लढवणार याबाबत अद्याप चर्चा सुरू झाल्या नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्वबळावर की आघाडी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेली तीस वर्षे आबा गटाची निर्विवाद सत्ता आहे. २०१७ ची पहिली निवडणूक ही आबा-काका अशा दोन गटांत अतिशय निकराने लढली गेली. त्यात केवळ व्यापारी गटातील एका जागेवर खासदार गटाला समाधान मानावे लागेल.

पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी असलेले हे दोन्ही गट आमने-सामने येणार, हे निश्चित आहे. तशी तयारी यापूर्वीच दोन्ही गटांनी केली आहे. उमेदवार निश्चितीची औपचारिकता मात्र शिल्लक आहे.

Sangli APMC Election News
Sangli APMC Election : सांगली जिल्ह्यातील सात बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी जुळवाजुळव

आटपाडी बाजार समितीत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी भूमिका मांडली आहे. त्यामुळे भाजपची एक हाती सत्ता काबीज करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी कंबर कसली असून बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.

शिराळा बाजार समितीत राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. नेत्यांनी मतदार याद्यांवरून राजकीय गणिते मांडण्यास सुरुवात केली आहे. ही लढत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच होणार आहे.

त्यामुळे अस्तित्वाच्या संघर्षाची लढाई सुरू झाल्याने बाजार समितीवर सत्ता कोणाची, याकडे सर्वांचे लक्ष आहे. एक वर्षापूर्वी शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे भाजपची सूत्रे सत्यजित देशमुख यांच्या हाती आली.

पलूस बाजार समितीत काँग्रेसने वर्चस्व कायम असून निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक रंगणार, राष्ट्रवादी आणि भाजप काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Sangli APMC Election News
APMC Election : बाजार समिती निवडणुकीकरता पहिल्याच दिवशी २४९ अर्जांची विक्री

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची निवडणुकीत उडी

जिल्ह्यातील सात बाजार समित्यांची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर सांगली, तासगाव आणि पलूस बाजार समितीच्या निवडणुका स्वाभिमानी शेतकरी संघटना ताकदीने लढणार असल्याची माहिती ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com