Agriculture Mechanization
Agriculture MechanizationAgrowon

Agriculture Mechanization Scheme : कृषी यांत्रिकीकरणांतर्गत सात हजारांवर शेतकऱ्यांनी घेतला लाभ

शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करणे व कृषी क्षेत्रात ऊर्जेचा वापर वाढवणे या मुख्य उद्देशाने शासनाकडून कृषी यांत्रिकीकरण उपअभियान कार्यक्रम राबवण्यात येतो.

Satara News : शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करणे व कृषी क्षेत्रात ऊर्जेचा वापर वाढवणे या मुख्य उद्देशाने शासनाकडून कृषी यांत्रिकीकरण (Agriculture Mechanization) उपअभियान कार्यक्रम राबवण्यात येतो.

सातारा जिल्ह्यात यंदाच्या वर्षी या योजनेंतर्गत ३९ हजार ४६८ जणांची या योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. तर आतापर्यंत ७ हजार ९९० जणांनी या योजनांचा लाभ घेतला आहे. एकूण ४२ कोटी रुपयांपेक्षा जास्ती अनुदान प्राप्त झाले आहे.

कृषी यांत्रिकीकरण अभियानांतर्गत विविध घटकांना अर्थसाहाय्य करण्यात येते. त्यामध्ये कृषी यंत्र सामग्री व उपकरणे खरेदी, भाडे तत्त्वावर कृषी यांत्रिकीकरण सेवेसाठी कृषी औजारे बँक स्थापने, उच्च तंत्रज्ञान व उत्पादनक्षम आधारित साहित्याचे हब निर्मिती या घटकांचा समावेश आहे.

Agriculture Mechanization
Agriculture Mechanization Subsidy : कृषी यांत्रिकीकरणासाठी शेतकऱ्यांना ३५ कोटींचे अनुदान

कृषी यांत्रिकीकरणांतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पावर टिलर, स्वयंचलित यंत्र व औजारे, ट्रॅक्टर व पावर टिलर चलित यंत्र व औजारे, पीक संरक्षण साधने, मनुष्य व बैल चलित औजारे, प्रक्रिया युनिट्स, भाडे तत्त्वावर कृषी यंत्र व औजारे सेवा पुरवठा केंद्राची उभारणी या घटकांसाठी अनुदान दिले जाते.

ट्रॅक्टरसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक व महिला लाभार्थींना किमतीच्या ५० टक्के किंवा १ लाख २५ हजार रुपये या पैकी जे कमी असेल ते. इतर लाभार्थ्यांना ४० टक्के किंवा १ लाख या पैकी जे कमी असेल त्याप्रमाणे लाभ दिला जातो.

इतर औजारांसाठी कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाच्या केंद्र शासनाने ठरवलेल्या जास्तीत जास्त मर्यादा किंवा संबंधित औजाराच्या किंमतीची ठरलेली टक्केवारी या पैकी कमी असेल ते, यानुसार अनुदान दिले जाते. शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ मिळवून देणारी ही योजना आहे.

यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होऊन जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने शेती करणे तसेच उत्पादनामध्ये वाढ होण्यासही यामुळे मदत होत आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीही या योजनेचा चांगला फायदा होत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com