Sharad Pawar : राज्यघटना वाचविण्याच्या युद्धात पवार यांचे मोठे महत्त्व : थोरात

Sharad Pawar Retirement : राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon

Nagar News : राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्याच्या परिस्थितीत देशाची लोकशाही व राज्यघटना वाचविण्यासाठी सुरू असलेल्या या युद्धात त्यांचे महत्त्व मोठे असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात (MLA Balasaheb Thorat) यांनी केले.

Sharad Pawar
Sharad Pawar News: एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय घेणार: शरद पवार

शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेबाबत ते संगमनेर येथे प्रसिद्धिमाध्यमांशी बोलत होते. श्री. थोरात म्हणाले, की देशाचे ज्येष्ठ नेते व राज्यसभेचे खासदार शरद पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्तीचा निर्णय अनपेक्षित आहे.

देश सध्या ज्या परिस्थितीतून जातो आहे, अशा अडचणीच्या काळात लोकशाही व राज्यघटना वाचविण्यासाठी सुरू असलेल्या नवीन युद्धात पवार साहेबांचे महत्त्व मोठे आहे.

लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या लढाईत साथ देणारी देशपातळीवरील महत्त्वाची व्यक्ती म्हणजे शरद पवार आहेत.

त्यामुळे देशातील लोकशाही व संविधानाच्या बळकटीसाठी पवार यांनी राजकारणात सक्रिय राहणे अत्यंत गरजेचे असून, त्यांनी बाजूला जाऊन चालणार नाही, असे आमदार थोरात यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com