Resod Market Committee : रिसोड बाजार समिती सभापती निवडीसाठी मोर्चेबांधणी

Washim Apmc Update : वाशीम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीकरिता हालचालींना वेग आला आहे.
Resod Market Committee
Resod Market CommitteeAgrowon

Washim Market Committee Election : वाशीम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदाच्या निवडणुकीकरिता हालचालींना वेग आला आहे. आजपर्यंत बिनविरोध झालेली सभापतिपदाची निवड यावेळेस मात्र शक्य दिसत नाही. महाविकास आघाडीने डोकेदुखी वाढविण्याची शक्यता बाजार समितीच्या वर्तुळामध्ये बोलली जात आहे.

नुकत्याच पार पडलेल्या रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपने बहुमताचा आकडा गाठलेला असून येत्या २२ मे नंतर सभापतीची निवडणूक होईल. मात्र तत्पूर्वी तालुक्यातील राजकीय क्षेत्रात विविध चर्चेला उधाण आलेले आहे.

सभापतिपदासाठी कोण सक्षम यावर विविध चर्चा केली जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या निवडणुकीत १८ पैकी १० जागांवर भारतीय जनता पक्ष मित्रपक्षाने विजय मिळवून बहुमताचा आकडा गाठलेला आहे.

Resod Market Committee
Washim Market Committee Election : वाशिम बाजार समिती निवडणुकीत राजकीय घडामोडी वाढल्या

तसेच महाविकास आघाडीने आठ जागा काबीज केल्या आहेत. गेल्या दोन दशकांपासून सभापतिपदाची निवडणूक बिनविरोध झालेली होती. मात्र या वेळेस निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे संकेत आहेत. कारण यावेळी महाविकास आघाडीने बाजार समितीमध्ये सत्ता काबीज केली नसली तरी मात्र एक मोठा विरोधी पक्ष तयार केलेला आहे.

रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १९५५ मध्ये स्थापनेनंतर एकूण २३ सभापती, तर नऊ प्रशासकांनी कारभार पाहिलेला आहे. यामध्ये तब्बल चार वेळा श्यामराव उगले यांनी तर तीन वेळा गजानन पाचारणे यांनी सभापती पद भूषविलेले आहे. यामुळे सद्यःस्थितीत या दोघांच्या नावाची चर्चा असली तरी मात्र तिसरा कोणी होऊ शकते अशी ही चर्चा ऐकायला मिळत आहे.

या दोघांना बाजार समितीचा तगडा अनुभव असला तरी भाजपचे नेते माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या निर्णयाकडे तालुकावासीयांचे लक्ष लागलेले आहे. सभापतिपदाच्या या स्पर्धेमध्ये राजेंद्र देशमुख यांचे सुद्धा नाव चर्चेत आले.

राजेंद्र देशमुख यांचा मागच्या निवडणुकीत एका मताने पराभव झाला होता. त्यावेळेसही त्यांचे सभापतिपदासाठी नाव चर्चेत होते. यंदाही या पदाचे दावेदार मानले जात आहे. मात्र शेवटी नेत्यांचा आदेशच सभापती ठरवणार हे मात्र नक्की.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com