Farmers Union Elections : पाचोरा शेतकरी संघाच्या निवडणुकीत ‘मविआ’ उतरणार

Mahavikas Aghadi : भडगाव शेतकरी सहकारी संघाची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित लढविली जाणार असल्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
Mahavikas Aghadi
Mahavikas AghadiAgrowon

Mahavikas Aghadi Jalgaon News : भडगाव शेतकरी सहकारी संघाची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित लढविली जाणार असल्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ही तिन्ही पक्ष एकत्रित लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi Latest : फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात आघाडीची आज वज्रमुठ सभा

भडगाव शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भडगावात येथील शासकीय विश्रामगृहात महाविकास आघाडीतील नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात बाजार समितीप्रमाणे शेतकरी सहकारी संघाची निवडणूक ही एकत्रित लढण्याचा निर्णय झाल्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी सांगितले.

शिवसेना (ठाकरे गट) च्या नेत्या वैशाली सूर्यवंशी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, जिल्हा बँकेचे माजी संचालक नानासाहेब देशमुख यांच्यात चर्चा होऊन एकत्रित निवडणूक लढण्याचा निर्णय झाला.

दिलीप या वेळी पंचायत समितीचे माजी सभापती मोहन पाटील, बाजार समितीचे संचालक श्‍यामकांत भोसले, गिरडचे मधुकर पाटील, पाढंरदचे मच्छिंद्र पाटील, डाॅ. सुनील पाटील, डाॅ. अमृत पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राहुल पाटील, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष हर्षल पाटील, प्रकाश पाटील, युवकचे तालुकाध्यक्ष कुणाल पाटील, आमडद्याचे शिवाजी पाटील, लोणपिराचेचे राजेंद्र पाटील आदी उपस्थिती होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com