Farm Road : नागपूरमध्ये पाणंद रस्त्यासाठी संघर्ष

अमृतराव देशमुख यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गेल्या सहा ते सात वर्षांपासून रस्त्याचे काम करण्यात यावे अशी मागणी देशमुख यांनी केली.
Panand Road
Panand RoadAgrowon

Yavatmal Rural Road News : शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासूनची पाणंद रस्त्याची (Panand Road) मागणी देखील प्रशासन पूर्ण करू शकले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा पाणंद रस्त्यासाठी संघर्ष सुरूच राहणार आहे.

शेतकरी आत्महत्याग्रस्त (Farmer Suicide) अशी यवतमाळ जिल्ह्याची जागतिकस्तरावर ओळख. मात्र याच जिल्ह्यातील काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी आपल्या प्रयत्नातून ही ओळख पुसण्याची केविलवाणी धडपड चालविली आहे.

शेतीपूरक तंत्रज्ञानाच्या बळावर या शेतकऱ्यांनी कपाशी, सोयाबीन, तूर यासह पारंपरिक पिकाच्या उत्पादकतेत वाढीचे विक्रम नोंदविले. त्यामध्ये महागाव तालुक्यातील अंबोडाचे रहिवासी व अमृत पॅटर्नचे जनक अमृतराव देशमुख यांचा समावेश होतो.

त्याच्या तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार झाल्याने महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यातील तब्बल दीड लाख शेतकरी त्यांचे फॉलोवर्स आहेत. दिवसाला शेकडो शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देत त्यांनी केलेल्या प्रयोगाची पाहणी करून माहिती घेतात.

Panand Road
Chandrapur : चंद्रपुरातील पाणंद रस्ते निधीअभावी रखडले

मात्र याच अमृतराव देशमुख यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. गेल्या सहा ते सात वर्षांपासून रस्त्याचे काम करण्यात यावे अशी मागणी देशमुख यांनी केली.

प्रशासनासोबत सातत्याने पत्रव्यवहार केल्यानंतरही कोणतीच दखल घेण्यात आली नाही असे त्यांनी सांगितले. अशीच काहीशी अवस्था जिजामाता कृषिभूषण पुरस्काराने राज्य शासनाकडून गौरविण्यात आलेल्या लक्ष्मीबाई पारवेकर यांची आहे.

गेल्या अकरा ते बारा वर्षांपासून त्यांनी फूलशेतीत सातत्य राखले आहे. त्यांच्या याच प्रयोगशीलतेची दखल घेत त्यांना गौरविण्यात आले. त्यांच्या शेती प्रयोगाची पाहणी करण्यासाठी शेतकरी सवना गावातील त्यांच्या शिवाराला भेट देतात.

मात्र शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने या शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

जिल्हाधिकाऱ्यांकडून अपेक्षा

गेल्या अनेक वर्षांपासून या शेतकऱ्यांनी पाणंद रस्त्यासाठी पाठपुरावा चालविला आहे. विद्यमान जिल्हाधिकारी अमोल येडगे शेतकरी हिताचे अनेक उपक्रम राबवीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून हा प्रश्न निकाली निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com