Tembu Water Project Management : ‘टेंभू’च्या पाणी व्यवस्थापनासाठी यंत्रणा लागली कामाला

पाण्याचे नियोजन आणि सुसंवादासाठी पाण्याशी संबंधित टेंभू आणि पाटबंधारे विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ग्रुप बनवून समाजमाध्यमाचा वापर सुरू केला.
Water Project
Water ProjectAgrowon

Sangli News : ‘टेंभूच्या पाणी वाटपाचा फज्जा’ या शीर्षकाखाली ‘सकाळ ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर आणि आमदार अनिल बाबर यांनी टेंभूच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्यानंतर टेंभू आणि पाटबंधारे विभागाचे (Irrigation Department) शाखा अभियंता, उपविभागीय अधिकारी, कर्मचारी आणि पाईपलाईनवर देखरेख ठेवणाऱ्या ठेकेदाराची यंत्रणा गतीने कामाला लागली.

तातडीने पाईपलाईनवर व्यवस्थापनासाठी (pipeline management) दहा किलोमीटरमागे एका माणसाची नेमणूक करून पाण्याचे नियोजन आणि सुसंवादासाठी पाण्याशी संबंधित टेंभू आणि पाटबंधारे विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ग्रुप बनवून समाजमाध्यमाचा वापर सुरू केला.

अधीक्षक अभियंता सुर्वे यांनी तातडीने टेंभू विभागाचे अधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि पाईपलाईनचे काम करणाऱ्या ठेकेदारांची ऑनलाइन बैठक घेतली.

टेंभूचे उपविभागीय अभियंता वाकाडे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सारनकर, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता सुशीलकुमार गायकवाड, ‘पाटबंधारे’चे शाखा अभियंता महेश पाटील, कनिष्ठ अभियंता लोंढे, ‘टेंभू’चे कनिष्ठ अभियंता अमय शिंदे आणि काम करणारे ठेकेदार या वेळी उपस्थित होते.

Water Project
Agriculture Irrigation : ‘टेंभू’च्या पाणी नियोजनाचा फज्जा

बैठकीत विस्कळित झालेल्या पाणी व्यवस्थापनावर गांभीर्याने चर्चा झाली. आटपाडी पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता त्यांच्याकडे पाण्याची आलेली मागणी उपविभागीय अभियंता सुशीलकुमार गायकवाड यांना कळवतील.

उपविभागीय अभियंता गायकवाड टेंभूच्या उपविभागीय कार्यालयाकडे कळवतील. टेंभूच्या उपविभागीय कार्यालयाकडे पाणी देण्याची जबाबदारी निश्चित केली. टेंभूच्या उपविभागीय कार्यालयातून नियोजन करून ठेकेदाराला कळवतील.

तसेच प्रत्येक दहा किलोमीटर पाईपलाईनसाठी पाणी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र एक माणूस नेमण्याचा निर्णय झाला.

बैठकीनंतर तातडीने नवीन माणसांची नियुक्तीही केली. तसेच पाटबंधारे विभाग, टेंभू कार्यालय आणि पाणी व्यवस्थापन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा एकत्रित सुसंवादासाठी समाजमाध्यमावर ग्रुप स्थापन केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com