Bird Animal Count
Bird Animal CountAgrowon

Bird Animal Count : ‘माळढोक’च्या अस्तित्वावर अखेर शिक्कामोर्तब

Bird Animal : बुद्धपौर्णिमेच्या रात्री झालेल्या पक्षी प्राणी गणनेत नान्नज अभयारण्यात यंदाही निलगायींचे दर्शन झाले असून काळविटांची संख्या कमी झाली आहे तर रानडुकरांच्या संख्येत वाढ झाली आहे.

Bird Animal Count Solapur News : बुद्धपौर्णिमेच्या रात्री झालेल्या पक्षी प्राणी गणनेत नान्नज अभयारण्यात यंदाही निलगायींचे दर्शन झाले असून काळविटांची संख्या कमी झाली आहे तर रानडुकरांच्या संख्येत वाढ झाली आहे. ही वाढ इतर प्राणी व शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

शुक्रवार (ता.५) गणनेत माळढोक दर्शन झाले नसले तरी २७ एप्रिल रोजी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माळढोक पक्षी आढळलेला असून त्याच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झाले आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील काही राजकीय पदाधिकारी तसेच सोलापूर शहरातील काहीजणांकडून जिल्ह्यात माळढोकाचे अस्तित्व नसल्याचा अपप्रचार केला जातो.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गावडी दारफळ येथे एकाच वेळी दोन माळढोकांचे दर्शन एका तरुण शेतकऱ्यास झाल्यानंतर अनेक दिवस वन विभागाकडून वॉच ठेवण्यात आला होता. २७ एप्रिल रोजी नान्नज अभयारण्यात माळढोकाच्या मादीने दर्शन दिल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी जावळे यांनी दिली.

Bird Animal Count
Animal and bird exhibition : सिंधुदुर्गात ६ मेपासून कृषी, पशुपक्षी प्रदर्शन

बुद्धपौर्णिमेच्या रात्री झालेल्या पक्षी व प्राणी गणनेत काळवीट, लांडगा, ससा, खोकड, मुंगूस, रानडुक्कर, रानमांजर, मोर सायळ, घोरपड व निलगायींनी दर्शन दिले आहे.

निलगायींची पडली नव्याने भर

पंधरा- वीस वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यात शक्यतो न आढळणारा निलगाय हा हरिण कुळातील प्राणी अलीकडील पाच वर्षात अनेक वेळा दर्शन देत आहे. पानगाव, गंगेवाडीसह नान्नज, अभयारण्यात त्याचे अस्तित्व आहे.

विदर्भात या प्राण्याची संख्या बरीच आहे. संरक्षक सूचीतील हा प्राणी असून शाकाहारी व निरुपद्रवी आहे. माणसांवर किंवा प्राण्यांवर हल्ला करत नाही.

गतवर्षी व यंदाचा घोषवारा

वन्याप्राण्याचे नाव - २०२२- २०२३

काळवीट - ३७४- ३४८

लांडगा - ११- १०

ससा - ३२- ३८

खोकड- ८- ६

मुंगूस- १३ -८

रानडुक्कर - २२०- २३४

रानमांजर - ७- ५

मोर - २७- ३७

सायळ- ३- ६

घोरपड - ३- ४

कोल्हा - १ - १

निलगाय- ४ - ४

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com