
आनंदा सूर्यवंशी
Narsi Fata Rain News : राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाच्या हजेरीने शेतकरी अडचणीत आला आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे या पावसामुळे नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे.
विदर्भ, मराठवाड्यासह राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाऊस कोसळत आहे. शुक्रवारी पाहटे अवकाळी पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा तासापेक्षा अधिक काळ चाललेल्या या पावसाने अनेक पिकांचे नुकसान केले आहे.
वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे बागातदारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे झाडावर असलेले फळ खाली आले असून वातावरणीय बदलाचा फटका फळांना बसला आहे.
या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. नांदेडमध्येही हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरला असून नायगाव तालुक्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली होती.
या पावसामुळे रब्बी हंगामातील भूईमुगसह ज्वारी या काढणीस आलेल्या पिकाला फटका बसला आहे. त्यामुळे जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
नरसीत रविवारी (ता.सात) रोजीस र्व ढगाळ वातावरण असल्याने दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात होती.
जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे तालुक्यात मोठे नुकसान झाले होते. काढणीस आलेल्या पीक वाऱ्यामुळे आडवे पडले होते तर ज्वारी पिकाला देखील मोठा फटका बसला होता. असे असतानाच आता पुन्हा एकदा हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरला असून शेतकरी चिंतेत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.