Nanded APMC Election
Nanded APMC ElectionAgrowon

Nanded APMC Election : बाजार समिती निवडणुकीत दिग्गज उतरणार रिंगणात

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज उतरण्याच्या तयारीत आहेत.

Nanded News : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये (Nanded Agriculture Produce Market Committee Election) अनेक दिग्गज उतरण्याच्या तयारीत आहेत. मागील दोन दिवसांत १०१ उमेदवारांनी अर्ज विकत घेतले आहेत.

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सेवा सहकारी सोसायटी, ग्रामपंचायत, शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी, आर्थिक दुर्बल घटकातील अनेक दिग्गजांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत.

उमेदवारी अर्जाची तारीख जाहीर झाल्यानंतर ता. २७ मार्च रोजी ४५ अर्ज विक्री झाले आहेत. तर ता. २८ मार्च रोजी ५६ अर्जांची विक्री झाली.

Nanded APMC Election
Jalgaon Apmc Election : जळगाव जिल्ह्यात बाजार समिती निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीच्या हालचाली

यामध्ये पंचायत समितीचे माजी सभापती मोतीराम मोरे ब्राह्मणवाडेकर, माजी संचालक भगवानराव पाटील आलेगावकर, विद्यमान संचालक दीपक पाटील, नागोराव पाटील, धनश्री पाटील, माधवराव वाघ, धर्मराज देशमुख, किशोर देशमुख, बाबूराव हेंद्रे, विनूबाई क्षीरसागर, संभाजी पाटील पुयड, श्रीराम पाटील, बालाजी सूर्यवंशी, मुदखेड तालुक्यातून गणेशराव शिंदे, शंकर मनुकवाड, शंकर पवार, दाजीबा येडे, विजय शिंदे, वंदना कोरे यांचा समावेश आहे.

काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडे दाखल केले आहेत.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली इच्छुक उमेदवारांची बैठक होणार आहे. त्यानंतर काँग्रेस उमेदवार कोण हे निश्‍चित होणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्राने दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com