Ethanol Production : शिराळ्याचा ‘नाईक साखर कारखाना’ इथेनॉल, बायोगॅस निर्मिती करणार

नाईक कारखाना इथेनॉल, बायोगॅस, पोटॅश व पोटॅश गोळी खत अशा चार उत्पादनांची निर्मिती करेल. त्यासाठी यंत्रणेत आवश्यक त्या सुधारणा करण्याचे काम सुरू आहे.
Vishwasrao Naik Sugar factory
Vishwasrao Naik Sugar factoryAgrowon

Shirola News : चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याच्या २०२३-२४ च्या गळीत हंगामात इथेनॉल (Ethanol), बायोगॅस (Biogas), पोटॉश व पोटॅश गोळी खत अशी चार उत्पादने निर्मिती (Ethanol Production) करेल, असे प्रतिपादन कारखान्याचे संचालक, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी केले.

कारखान्यात ७ लाख ४ हजार ७०० क्विंटल साखर पोत्यांचे पूजन व २०२२-२३ गळीत हंगाम सांगता समारंभ प्रसंगी नाईक बोलत होते. उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरुडकर अध्यक्षस्थानी होते.

Vishwasrao Naik Sugar factory
Sugar Production : भारतीय साखरेला मागणी कायम

संचालक नाईक म्हणाले, की हंगामात ५ लाख ६८ हजार ३२६ टन गाळप करून ७ लाख ४ हजार ४०० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. पुढील गळीत हंगामात सध्याच्या गाळप क्षमतेत वाढ करून प्रतिदिनी ६ हजार टन गाळप क्षमता करणार आहे.

इथेनॉल, बायोगॅस, पोटॅश व पोटॅश गोळी खत अशी चार उत्पादने कारखाना निर्मिती करेल. त्यासाठी यंत्रणेत आवश्यक त्या सुधारणा करण्याचे काम सुरू आहे, असे सांगण्यात आले.

या हंगामात निर्यात साखरेला चांगला दर मिळाला. त्यामुळे केंद्र सरकारने प्रत्येक कारखान्यास दिलेला निर्यात साखरेचा कोठा वाढवून द्यायला हवा होता. मात्र केंद्राने तो वाढवला नाही.

उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील म्हणाले, की साखर कारखान्यांना ऊसाच्या तोडणी यंत्रणेची मोठी कमतरता प्रत्येक हंगामात भासत आली आहे. यावर उपाय म्हणून स्थानिक तोडणी यंत्रणा निर्माण व्हायला हव्यात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com