Water Stock In Marathwada : मराठवाड्यातील पाणीसाठा निम्म्यावर

मराठवाड्यात एकीकडे अवेळी पावसाचे व गारपिटीचे संकट असतानाच विविध प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा ५१ टक्क्यांवर आला आहे.
Water Stock
Water StockAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा (Water Stock) जवळपास निम्म्यांवर आला आहे. लघू प्रकल्पांमध्ये तर केवळ २९ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून, मध्यम प्रकल्पातही ४३ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्यावतीने देण्यात आली.

मराठवाड्यात एकीकडे अवेळी पावसाचे व गारपिटीचे संकट असतानाच विविध प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा ५१ टक्क्यांवर आला आहे.

मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा ६० टक्के शिल्लक असून गोदावरी नदीवरील पंधराबंधाऱ्यांमधील पाणीसाठा ४५ टक्क्यांवर, तेरणा, मांजरा, रेणा, नदीवरील २५ बंधाऱ्यातील पाणीसाठा ३४ टक्क्यांवर आला आहे. मध्यम ७५ प्रकल्पात ४३ टक्के, तर लघू प्रकल्पात केवळ २९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

Water Stock
Water Stock In Jalna : निम्न दुधना प्रकल्पातील पाणीसाठा ४३ टक्क्यांवर

मोठे प्रकल्प

मोठ्या ११ प्रकल्पापैकी जायकवाडी मांजरा प्रकल्पात प्रत्येकी ५८ टक्के, येलदरी ६९ टक्के, सिद्धेश्वर ४५ टक्के, माजलगाव ५२ टक्के, ऊर्ध्व पेनगंगा ६२ टक्के, निम्न तेरणा ६१ टक्के, निम्नमनार ४५ टक्के, निम्न दुधना ४४ टक्के, सीनाकोळेगाव सर्वात कमी ४२ टक्के, तर विष्णुपुरी प्रकल्पात ८२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता.

मध्यम प्रकल्प

मराठवाड्यातील ७५ माध्यम प्रकल्पांपैकी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १६ प्रकल्पात ४० टक्के, जालनामधील ७ प्रकल्पात ३९ टक्के, बीडमधील १६ प्रकल्पात ५३ टक्के, लातूरमधील ८ प्रकल्पात ४२ टक्के, धाराशिवमधील १७ प्रकल्पात ४५ टक्के, नांदेडमधील ९ प्रकल्पात ३९ टक्के तर परभणीमधील दोन मध्यम प्रकल्पात ४१ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता.

Water Stock
Water Reservoir : धरणांत यंदा कमी पाणीसाठा

लघू प्रकल्प स्थिती

मराठवाड्यात ७४९ लघू प्रकल्प आहेत. त्यापैकी छत्रपती संभाजीनगरमधील ९७ प्रकल्पात २६ टक्के, जालनामधील ५७ प्रकल्पात २७ टक्के, बीडमधील १२६ प्रकल्पात ३२ टक्के, धाराशिवमधील २०६ प्रकल्पात २८ टक्के, लातूरमधील १३४ प्रकल्पात ३२ टक्के, नांदेडमधील ८० प्रकल्पात ३४ टक्के, परभणीमधील २२ प्रकल्पात २२ टक्के तर हिंगोलीतील २७ लघू प्रकल्पात सर्वात कमी १५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा कमी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com