Peek Pahani : गहू, हरभरा पीक प्रात्यक्षिक पाहणी कार्यक्रम

शेतकऱ्यांनी विविध पिकांच्या प्रमाणित बियाणांचा वापर पेरणीसाठी करावा. जैविक घटकांची बीजप्रक्रिया करून पेरणी करावी. जैविक खतांच्या वापरावर भर द्यावा.
Peek Pahani
Peek PahaniAgrowon

Parbhani News : महाबीज (महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ) तर्फे ताडबोरगाव (ता. मानवत) येथे गव्हाच्या (Wheat) ४९६ आणि हरभऱ्याच्या (Chana) फुले विक्रांत (Phule Vikrant Verity) या वाणांची पीक प्रात्यक्षिक पाहणी आणि शेतकरी प्रशिक्षण शुक्रवारी (ता. २४) घेण्यात आले.

अध्यक्षस्थानी किन्होळा येथील प्रगतशील शेतकरी मधुकरराव खरवडे होते. पंचायत समितीचे माजी सभापती कुमार गुंगाने, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील येथील शास्त्रज्ञ प्रा. डॉ. विवेक घुगे, महाबीजचे विभागीय व्यवस्थापक डि. डि. कान्हेड, जिल्हा व्यवस्थापक अरुण चव्हाण, सरपंच केशवराव आवचार, महाबीजचे क्षेत्र अधिकारी सचिन सोनवणे, सचिन काळे, मोहन धांडे, धनंजय गायकवाड, रूपाली जावळे, मुक्ता निंबाळकर आदींची उपस्थिती होती.

Peek Pahani
Chana Market : रब्बी हरभरा खरेदीला कधी मिळणार मुहूर्त?

कान्हेड म्हणाले, की शेतकऱ्यांनी विविध पिकांच्या प्रमाणित बियाणांचा वापर पेरणीसाठी करावा. जैविक घटकांची बीजप्रक्रिया करून पेरणी करावी. जैविक खतांच्या वापरावर भर द्यावा.

डॉ. घुगे म्हणाले, की जमिनीत पुरेशा ओलावा उपलब्ध झाल्याशिवाय पेरणी करू नये. रुंद वरंबा सरी (बीबीएफ) तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. त्यामुळे पिकांमध्ये अतिरिक्त पाणी साचणार नाही.

मूलस्थांनी जलसंधारणामुळे पावसाच्या खंड काळात पिके तग धरुन राहतील. हवा खेळती राहील. उत्पादनात वाढ होईल. प्रास्ताविक चव्हाण यांनी तर सूत्रसंचालन बलभीम माथेले यांनी केले. ताडबोरगाव, किन्होळा, देवलगाव आदी गावातील शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com