Cashew Crop Management : शेतकरी नियोजन पीक : काजू

साधारण डिसेंबर, जानेवारी महिन्यापासून झाडांना मोहर येण्यास सुरुवात होते.
Cashew Management
Cashew ManagementAgrowon

Cashew Crop Management :

शेतकरी ः माधव दिनकर साटम

गाव ः शिरगाव, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग

एकूण क्षेत्र ः २० एकर

काजू लागवड ः तीन एकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरगाव (ता. देवगड) येथे माधव साटम यांची २० एकर जमीन आहे. त्यातील सात एकरांमध्ये आंबा लागवड (Mango Cultivation) तर तीन एकरांमध्ये काजू लागवड (Cashew Cultivation) आहे.

त्यात वेंगुर्ला सात या जातीची सुमारे २०० कलमे आहेत. संपूर्ण काजू बागेचे व्यवस्थापन (Cashew Orchard Management) सेंद्रिय पद्धतीने करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

Cashew Management
Cashew Nut : रत्नागिरी बाजार समितीची काजू बी शेतीमाल तारण योजना

व्यवस्थापनातील बाबी

१) संपूर्ण बागेचे व्यवस्थापन सेंद्रिय पद्धतीने केले जाते. त्यामुळे तणनियंत्रणासाठी कोणत्याही तणनाशकांचा वापर केला जात नाही. पाऊस थांबल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात संपूर्ण बागेतील तण ग्रासकटरच्या साह्याने काढून घेतले.

काढलेले गवत गोळा करून झाडाच्या बुंध्याजवळ ठेवले. जेणेकरून त्याचा झाडाला फायदा होईल.

२) साधारण डिसेंबर महिन्यात झाडांना पालवी फुटण्यास सुरुवात झाली. या कालावधीत झाडांवर ढेकण्या (टी-मॉस्किटो बग) किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.

परंतु साटम यांच्या बागेत किडीचा प्रादुर्भाव अत्यंत कमी प्रमाणात होत असल्याचे ते सांगतात. किडीच्या प्रादुर्भावासाठी झाडांचे सातत्याने निरीक्षण केले जाते.

३) उन्हाळ्यात वणवे लागण्याची शक्यता असते. त्यासाठी दरवर्षी डिसेंबर महिन्यात काजू बागेभोवती आगरेषा (मार्किंग) करून घेतले आहे. तसेच बागेभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो.

४) साधारण डिसेंबर, जानेवारी महिन्यापासून झाडांना मोहर येण्यास सुरुवात होते. या कालावधीत बागेत दिवसातून किमान एक फेरी मारली जाते. झाडांवरील पाने, मोहोर आणि फळांचे निरीक्षण केले जाते.

Cashew Management
Cashew Development Scheme : १३२५ कोटींच्या खर्चाची काजू विकास योजना लागू

आगामी नियोजन ः

१) या वर्षी पाऊस लांबल्यामुळे काजू हंगाम लांबणार आहे. सध्या काजू बी परिपक्व होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास अद्यापही १५ ते २० दिवसांचा कालावधी लागेल.

२) झाडांवरच पूर्ण परिपक्व झालेल्या काजू बीची काढणी केली जाते. काजू बी आणि बोंड स्वच्छ धुऊन वेगळे केले जातात. उन्हामध्ये बी वाळवून घेतले जातील.

३) दरवर्षी मागणीप्रमाणे ओल्या काजूगराची देखील विक्री केली जाते. ग्राहकांच्या मागणीनुसार काजूगर काढण्याचे काम केले जाईल.

४) या वर्षी साधारण एप्रिल अखेरपर्यंत हंगाम चालेल.

५) काजू हंगाम संपल्यानंतर बागेतील पालापाचोळा गोळा करून झाडाच्या बुंध्यात रचून ठेवला जाईल. त्यामुळे उन्हाळ्यात झाडांच्या मुळांना उष्णतेचा त्रास कमी होतो. पावसाळ्यात हा पाचापाचोळा कुजतो. आणि झाडांना अन्नद्रव्यांची उपलब्धता होते, तसेच तणे वाढत नाहीत.

माधव साटम, ९७६४५९४०२७, (शब्दांकन ः एकनाथ पवार)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com