Agricultural Warehouse : गोदामामध्ये शेतीमालाची योग्य साठवणूक

शेतीमाल मूल्य साखळी विकसित करण्याची ही प्रक्रिया गोदाम विकासाच्या माध्यमातून पर्यायी बाजार व्यवस्था निर्मितीस नक्कीच हातभार लावू शकेल. त्यानुसार गोदाम प्रमाणीकरण करताना गोदामातील शेतीमाल व्यवस्थापन करताना नियमानुसार स्वीकृत कार्य प्रणाली सादर करणे आवश्यक आहे.
Warehouse
Warehouse Agrowon

Agriculture Warehousing Scheme : राज्यातील शेतकरी उत्पादक कंपनी (Farmer Producer Company) आणि सहकारी संस्था यांनी बांधलेल्या गोदामांचे ऑनलाइन पद्धतीने गोदाम प्रमाणीकरण (Warehouse Authentication) करताना आवश्यक कागदपत्रांमध्ये स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर /स्वीकृत कार्यप्रणाली (Accepted Operating Procedures)/प्रमाणित कामकाज प्रक्रिया सादर करावी लागते.

हस्तांतरीय अथवा निगोशिएबल वखार पावतीचा (NWR) वापर करून अन्नधान्य व इतर पदार्थांची व्यवस्थित साठवणूक होऊ शकते. तसेच शेतकरी कंपन्यांना (Farmer Company) गोदाम भाड्याने देण्यापेक्षा हक्काचे उत्पन्न मिळू शकते. तसेच त्या परिसरातील शेतकरीवर्ग शेतीमाल तत्काळ न विकता योग्य बाजारभाव आल्यावर शेतीमाल थेट गोदामातून (Godam) विकू शकतो.

वखार केंद्रावर ठेवीदाराला हस्तांतरीय वखार पावती (निगोशिएबल गोदाम पावती) ः

१) वखार केंद्रप्रमुखाने हस्तांतरीय वा अहस्तांतरीय ई-वखार पावती बनविण्यापूर्वी नियम क्र. ११ प्रमाणे सर्व नियमांत बसते की नाही याची खात्री करावी.

२) ई- वखार पावती देण्याची परवानगी वखार विकास व नियामक प्राधिकरणाच्या अधीक्षकांकडून मिळाल्यानंतर फक्त ई-वखार पावती देता येऊ शकेल.

Warehouse
Warehousing : राज्यस्तरावर स्वतंत्र गोदाम विभागाची स्थापना

ई-वखार पावती बनविण्यासाठी खाली नमूद केलेल्या अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

अ. जे गोदाम वखार विकास व नियामक प्राधिकरणामार्फत रजिस्टर केले असेल तेथे ई-वखार पावती सर्व ठेवीदारांच्या साठ्यावर देण्यात यावी.

ब. वखार केंद्र प्रमुख ई-हस्तांतरीय वखार पावती ठेवीदारांना देत असेल तर तसा उल्लेख वखार पावतीवर करावा.

क. ई-हस्तांतरीय वखार पावती देण्यासाठी असलेल्या नियमांप्रमाणे सर्व माहिती अर्जावर भरावी.

ड. केंद्रप्रमुखाने ठेवीदाराने ठेवलेल्या साठ्यावर नियमाप्रमाणे सर्व माहिती अर्जावर भरावी.

ई . केंद्रप्रमुखाने ई-वखार पावती ठेवीदाराला देण्यापूर्वी सर्व अधिनियमांचे पालन करावे.

ई. केंद्रप्रमुखाने प्रत्येक लॉटला वेगळी ई-वखार पावती द्यावी.

उ . ई-वखार पावतीवरील नमूद केलेल्या पोत्यांची संख्या,वजन व किंमत याच्यावर ॲडिजिव्ह टेप लावावी.

Warehouse
Agriculture Warehouse : गोदाम कामकाज स्वीकृत कार्यप्रणाली

वखार केंद्रावर साठ्याची व्यवस्थित थप्पी करणे, साठ्याची शास्त्रशुद्ध साठवणुकीची पद्धत :

वखार केंद्रावर साठवणुकीस ठेवलेल्या साठ्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

१. केंद्रप्रमुख सर्व साठ्याची दर पंधरा दिवसांनी तपासणी करतील, तसेच सर्व गोदामे स्वच्छ राहतील याची काळजी घेतील. साठ्यास कीड लागणार नाही तसेच उंदराचा प्रादुर्भाव राहणार नाही याची काळजी घेतील.

२. दर पंधरवड्याला वखार केंद्रप्रमुख साठविलेल्या साठ्याची मोजदाद करतील.

३. वखार केंद्रावर धूरीकरण व फवारणी करण्याची सोय असेल, ज्यायोगे साठा कीडरहित राहील याची काळजी घेतली जाईल.

४. वखार केंद्रावर धूरीकरण व फवारणी करण्यासाठी शिफारशीत रसायने, उंदीर मारण्यासाठीची औषधे याची उपलब्धता असेल.

५. वखार केंद्रावर धूरीकरण करण्यासाठी लागणारी सर्व व्यवस्था असेल.

६. वखार केंद्रावर साठवणुकीस ठेवलेल्या साठ्याला हवा मिळण्याची व्यवस्था असेल.

७. वखार केंद्रावर दर पंधरवड्यानंतर साठा तपासण्याची व्यवस्था असेल.

८. वखार केंद्रावर साठा बदलण्याच्या व्यवस्थेची वेगळी सोय असेल, ज्यायोगे कुठलाही साठा बदलायची सोय होईल.

साठा साठविणे आणि जागेचा उपयोग :

- नामांकित वखार केंद्रावर योग्य पद्धतीने थप्पी मारण्यात यावी. केंद्रप्रमुख हे वखार केंद्रावर साठा साठविण्यासाठी तसेच थप्पी मारण्यासाठी शास्त्रशुद्ध व्यवस्था करेल.

साठ्याची थप्पी करण्याचे नियोजन ः

१. गटाचा आकार ः

२. गटाची थप्पी अशा पद्धतीने करावी, की गोदामात हवा खेळती राहील. साठ्यातील धान्याला कीड लागणार नाही, याची व्यवस्था असेल, काही साठ्याची मोठी थप्पी मारता येते. उदाहरणार्थ साखर, ज्याला धूरीकरणाची गरज नसते.

गटाची थप्पी करण्यासाठीचे नियोजन ः

१. गोदामातील ३० फूट बाय २० फूट जागा आखून घ्यावी. प्रत्येक साठा ३० फूट बाय २० फूट या मोकळ्या जागेत करावा.

२. दोन गटांमध्ये २½ फुटाची जागा, तसेच भिंतीपासून २½ जागा सोडण्यात येईल, ज्यायोगे धूरीकरण तपासणी करणे व फवारणी करणे सुलभ होईल.

३. दरवाजापासून साठ्याची ४ फूट आत थप्पी मारण्यात येईल. गोदामात २७ टक्क्यांपेक्षा जादा मोकळी जागा ठेवण्यात येणार नाही.

४. साठ्याची थप्पी मारण्यासाठी ३० फूट बाय २० फूट जागा ठेवण्यात येईल, ज्यायोगे थप्पीवर धूरीकरणासाठी आच्छादन करता येईल.

५. गोदाम थप्पी अशा पद्धतीने घ्यावी की गोदामात प्रकाश व खेळती हवा राहील.

पोत्यांची थप्पी करण्यासाठी आखलेली रेषा :

१. पोत्यांची थप्पी घेताना ५ सेंमी जाड अशी पांढरी किंवा पिवळी रेष आखून त्यामध्ये थप्पी मारावी.

२. गटाचा नंबर मोठ्या अक्षरात थप्पी जवळच्या भिंतीवर किंवा जमिनीवर लिहावा.

गटाची उंची :

पोत्याची थप्पी ही साठवणुकीस ठेवणाऱ्या साठ्याप्रमाणे ठेवण्यात यावी. उदा. कडधान्ये २० थप्पीपर्यंत ठेवावे. साखरेची कितीही उंच थप्पी घेता येते. गटाची थप्पी अशा पद्धतीने घ्यावी की ज्यायोगे खालील साठा खराब होणार नाही.

Warehouse
Agriculture Warehouse : गोदाम उभारणी नोंदणी प्रक्रियेतील टप्पे

धान्याचा नमुना काढायची पद्धत

१) मोकळ्या पाल्याचा नमुना काढणे ः मोकळ्या पाल्यातून नमुना काढायचा असेल, तर तो निरनिराळ्या भागांतून एकत्र करून कमीत कमी २ किलोपर्यंत असेल याची काळजी घ्यावी.

२) प्रयोगशाळेत तपासण्याचा नमुना ः प्रयोगशाळेत तपासण्याचा नमुना हा मोकळा पाला असलेल्या भागातून निरनिराळ्या भागांतून काढून तो सँपल डिव्हायडरने २० ग्रॅम किंवा ५० ग्रॅमपर्यंत काढता येतो.

३) प्रयोग शाळेत तपासण्यासाठी ४ नमुने काढण्यात येतील. त्यातील ३ नमुने ठेवीदारांसमोर सँपल व स्लीप बॅगमध्ये भरण्यात येतील. ठेवीदार व केंद्र प्रमुखाने संयुक्तरीत्या सही केलेले सँपल स्लीप बॅगमध्ये ठेवण्यात येईल.

४) नमुन्यापैकी १ नमुना ठेवीदाराला देण्यात येईल. हे नमुने ठेवीदाराला पुन्हा साठ्याची जावक होताना दिले जातील.

५) वखार केंद्रावर सर्व नमुने काढल्याची व ठेवीदाराला एक नमुना दिल्याची नोंद ठेवली जाईल.

धान्याचा नमुना पाठविण्याची पद्धत :

१) धान्याचा एक नमुना जवळील एनएबीएल प्रमाणित प्रयोगशाळेत तपासणीसाठी सिलबंद करून पाठविला जाईल.

धान्याची प्रत तपासण्यासाठी लागणारी थप्पी ः

१) भारत सरकारच्या नियमानुसार भेसळयुक्त किंवा कीड लागलेले धान्य स्वीकारता येत नाही, त्यामुळे वखार केंद्रप्रमुखाने असे धान्य न स्वीकारण्याची काळजी घ्यावयाची असते.

२) वखार नियामक व विकास प्राधिकरणाच्या (WDRA) नियमाप्रमाणे प्रत्येक वखारकेंद्रावर सुसज्ज प्रयोगशाळा व नमुना तपासण्याची साधने ठेवण्याची गरज असते.

३) वखार केंद्रावर साठवणुकीस जो साठा ठेवायचा असतो तो ॲगमार्क ग्रेडप्रमाणे किंवा भारत सरकारच्या भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण (FSSIA) यांच्या सुचविलेल्या ग्रेडप्रमाणे असावा.

४) धान्याची प्रत प्रयोगशाळेत तपासण्यासाठी भारतीय मानक ब्युरोच्या (BIS) नियमानुसार तपासणी करावी.

५) साठ्यातील धान्याची प्रत ही भारत सरकारने ठरविलेल्या परिमाणाप्रमाणे असावी.

६) वखार केंद्रावरील नमुना तपासल्यानंतरच सर्व अहवाल वखार केंद्रावरील रजिस्टरमध्ये नोंद करण्यात यावे.

संपर्क ः प्रशांत चासकर, ९९७०३६४१३० (शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, एमसीडीसी, स्मार्ट महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या., पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com