
Agriculture Warehouse : साठ्याची काळजी घेण्यासाठी मुख्यत्वे इलेक्ट्रॉनिक हस्तांतरीय वखार पावती गरजेची असते. तपासणी करणारे अधिकारी नियमित कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त नियुक्ती केलेले असावे. वखार केंद्रावर महिन्याला लागणारी विम्याची (Warehouse Insurance) रक्कम कॉम्प्युटरद्वारे काढायची व्यवस्था असावी.
केंद्रप्रमुखाने वखार केंद्रावरील सर्व साठ्यांचा आग, भूकंप (Earthquake), चोरी, जबरी चोरीपासून मुक्त असण्यासाठी विमा काढावा. वखार केंद्रावरील येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीची नोंद असावी.
वखार केंद्रावरील कर्मचारी यांची नोंद होणारी पद्धत असावी. वखार केंद्रावरील इलेक्ट्रॉनिक हस्तांतरीय वखार पावतीवरील साठा कुठल्याही परिस्थितीत त्याच्या जाग्यावरून हलवू नये.
एखाद्या वखार पावतीवरील साठ्यावर बँकेचे कर्ज असेल, तर इलेक्ट्रॉनिक हस्तांतरीय वखार पावती रद्द करावी.
वखार केंद्रावरील साठ्याचे संरक्षण ः
१) वखार केंद्रावर पुरेसे पहारेकरी गरजेचे असावेत. पहारेकऱ्यांसाठी ड्यूटी रजिस्टर असावे.
२) केंद्र प्रमुखाने केंद्रावरील पहारेकऱ्यांना त्यांची जबाबदारी समजून सांगावी. साठ्याच्या सुरक्षिततेसाठी केंद्रप्रमुखाने पहारेकऱ्यांसाठी नियमावली तयार करावी.
३) केंद्रप्रमुखाने वखारकेंद्रावर पहारेकऱ्यांच्या केलेल्या सुरक्षिततेसाठीची दररोज शहानिशा करावी.
४) वखार केंद्रावरील साठ्याच्या सुरक्षिततेसाठी जर काही संकट आले तर पोलिस किंवा आग नियंत्रण कक्षाला संपर्काची व्यवस्था असावी.
वखार केंद्रावर आगीवर नियंत्रण ठेवण्याची पद्धती ः
१) वखार केंद्रावर आगप्रतिबंधाची सोय असावी.
२) वखार केंद्रावर अग्निशामक दल, पोलिस स्टेशन, वखार केंद्रावरील कर्मचाऱ्यांचे ध्वनी क्रमांक मोठ्या फलकावर लिहावेत.
३) वखार केंद्रावरील कोणालाही आगपेटी, गॅस लायटर, रसायने असे ज्वालाग्राही पदार्थ आणण्यापासून प्रतिबंध करावा. गोदामात इलेक्ट्रिक पॉइंट कुठल्याही परिस्थितीत ठेवू नये.
४) गोदाम किंवा गोदामातील परिसरात कागदाचे तुकडे, खराब पोत्यांचे तुकडे, पॉलिथिनचे तुकडे कुठल्याही परिस्थितीत राहणार नाहीत याची काळजी घ्यावी.
५) वखार केंद्रावरील लाइटिंगची व्यवस्था योग्य असावी. कुठल्याही परिस्थितीत खराब वायरिंग राहणार नाही याची काळजी घ्यावी.
६) गोदामाच्या भिंतीला भोक असू नये. दारे व खिडक्यांत फट असू नये, ज्यायोगे कोणीही जळती काडी टाकू शकणार नाही.
७) वखार केंद्रावर वाळू व पाणी उपलब्ध करावे. गोदामाबाहेरील बादल्यांमध्ये वाळू कायम ठेवावी. वाळूच्या बादल्यांना लाल रंग लावावा.
८) वखार केंद्रावरील सर्व कर्मचाऱ्यांना आग लागल्यावर ती विझविण्याचे प्रशिक्षण द्यावे. तसेच आग विझविण्यासाठी लागणारी उपकरणे कुठे आहेत याची माहिती घ्यावी.
९) गोदाम क्षमता १०,००० टन असणाऱ्या गोदामाला १ लाख लिटरची क्षमता असलेली पाण्याची टाकी असावी. ३० ते ४० मीटरपर्यंत फवारणी करणारा फायर फायटिंग पंप असावा. प्रत्येक मिनिटास ३०० ते ७०० लिटर पाणी फवारू शकणारा पंप असावा.
१०) वेळोवेळी वखार केंद्रावरील आग विझवणारी यंत्रणा कार्यरत आहे की नाही हे पाहावे.
११) वखार केंद्रावरील कर्मचारी प्रशिक्षित असतील तर त्यांची क्षमता तपासून पाहावी, फायर पंपाचे पाणी व्यवस्थित फवारले जाते की नाही हे तपासावे.
१२) वखार केंद्रावर आग लागल्यास भोंगा वाजवावा, ज्यायोगे सर्वांना सूचना मिळेल.
आग लागल्यावर विझविण्यासाठी प्रयत्न
१. वखार केंद्रावर आग लागल्यास फायर ब्रिगेडचा फोन नंबर लावावा.
२. टेलिफोनच्या जवळ फायर ब्रिगेडचा फोन नंबर भिंतीवर चिकटवावा.
३. आग लागल्यावर जखमी माणसाला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे.
४. वखार केंद्रावर उपलब्ध असलेल्या उपकरणांनी शक्यतो आग विझवावी.
५. गोदामात आग लागल्यास ज्वालाग्राही वस्तू इतरत्र न्यावी.
६. आग लागल्यावर उगीचच आरडाओरडा टाळून आग विझवण्यावर भर द्यावा.
संपर्क ः प्रशांत चासकर, ९९७०३६४१३० (शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, एमसीडीसी, स्मार्ट महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या., पुणे)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.