Maharashtra Politics : राजकारणात माणुसकीला फुंकर घालणारा कार्यकर्ता हवा : डॉ. सबनीस

आदर्श गाव हिवरेबाजार (ता. नगर) येथे आशिया मानवशक्ती विकास संस्था (पुणे) आणि आदर्श गाव हिवरेबाजार परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यकर्ता प्रबोधन शिबिराचे उद्‍घाटन करताना सबनीस बोलत होते.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsAgrowon

Nagar News : राजकारणात अराजकीय कार्यकर्ते ही काळाची गरज आहे. कारण राजकारण आता शुद्ध राहिलेले नाही, माणुसकीला फुंकर घालणारा कार्यकर्ता हवा, असे मत ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस (Prof. Dr. Shripal Sabnis) यांनी व्यक्त केले.

आदर्श गाव हिवरेबाजार (ता. नगर) येथे आशिया मानवशक्ती विकास संस्था (पुणे) आणि आदर्श गाव हिवरेबाजार परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यकर्ता प्रबोधन शिबिराचे उद्‍घाटन करताना सबनीस बोलत होते.

व्यासपीठावर पोपटराव पवार, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, सरपंच विमल ठाणगे, छबूराव ठाणगे, आशिया मानवशक्ती विकास संस्थेचे अध्यक्ष बाजीराव सातपुते प्रमुख उपस्थित होते.

या वेळी पाठ्यपुस्तकातील कवी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या भेटीला या कविसंमेलनात रानकवी तुकाराम धांडे, हनुमंत चांदगुडे, मृणालिनी कानिटकर, शंकर कसबे आणि अस्मिता चांदणे यांच्या कवितांना शालेय विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Maharashtra Politics
BBC IT Raid : ‘बीबीसी’ची विश्वासार्हता, छापे आणि राजकारण

‘कवितेच्या प्रांगणात अर्थात खेड्यातील कविता’ या कविवर्य भरत दौंडकर यांच्या सूत्रसंचालनाखाली झालेल्या निमंत्रितांच्या कविसंमेलनात अंजली कुलकर्णी, डी. के. शेख, प्रशांत केंदळे, सुरेश कंक, राजेंद्र वाघ, गणेश आघाव यांनी आपल्या वैविध्यपूर्ण कवितांच्या माध्यमातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या काव्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी उद्धव कानडे होते.

सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्य आणि पर्यावरण या क्षेत्रांत कृतिशील कार्य करणाऱ्या वैजिनाथ घोंगडे (नदी सुधार), रघुनाथ ढोले (वृक्षलागवड अन् जोपासना) आणि श्रीकांत चौगुले (साहित्य, शिक्षण, सांस्कृतिक) या विषयावरील अनुभवकथन केले. प्रारंभी दिगंबर ढोकले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सुदाम भोरे यांनी आभार मानले.

Maharashtra Politics
Farmer Market : शेतकरी आठवडे बाजार अतिक्रमणाच्या कचाट्यात

या वेळी सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिर्डे (उद्योजक रंगनाथ गोडगे-पाटील स्मृती सामाजिक कार्यकर्ता), प्रगतिशील शेतकरी सुभाष उमाप (यशवंतराव चव्हाण ग्रामभूषण), राजुरी येथील विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय (स्वामी विवेकानंद संस्कारक्षम शाळा) आणि कोथरूड (पुणे) येथील किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉईज युनियन (नारायण मेघाजी लोखंडे दीनबंधू) या व्यक्ती आणि संस्थांना गौरविण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com