Onion Storage : कांद्याच्या गुणवत्ता वाढीसाठी आधुनिक साठवणूक तंत्राचा अवलंब

Team Agrowon

कांदा लागवड

नाशिक जिल्ह्यातील साताळी (ता. येवला) कोकाटे शेतकरी बंधू परिसरात प्रगतिशील कांदा उत्पादक म्हणून प्रसिध्द आहेत. ते दरवर्षी वजिलोपर्जित टिकवलेल्या कांद्याच्या 'नाशिक गुलाबी' वाणाची लागवड करतात.

Onion Cultivation | Mukund Pingle

शेतीची बलस्थाने

शास्त्रीय पद्धतींनी व्यवस्थापन, रासायनिक कीडनाशकांचा मर्यादित वापर, जैविक निविष्ठांवर अधिक भर, काढणीपश्‍चात साठवणूक व बाजारपेठांचा अभ्यास ही कोकाटे यांच्या शेतीची बलस्थाने आहेत.

Onion Storage | Mukund Pingle

कांदा बीजोत्पादन

दरवर्षी १७ एकरांसाठी पुरेल एवढे बियाणे तयार करण्यासाठी स्वतःच बीजोत्पादन करतात. त्यातून खात्रीशीर व गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध होते.

Onion Storage | Mukund Pingle

कांदा काढणी

कांदा पात पिवळी होऊन ६० ते ७० टक्के माना पडल्यानंतर काढणीस केली जाते. काढणी केलेला कांदा ट्रॉलीमध्ये भरून चाळीजवळ सावलीत आणून पोळ मारून साठवला जातो.

Onion Storage | Mukund Pingle

कांदा साठवणूक

कांदा साठवणुकीसाठी चाळीची स्वच्छता आणि चार दिवस आधी बुरशीनाशक फवारणी केली जाते.

Onion Storage | Mukund Pingle

कांदा प्रतवारी

चिंगळी,गोल्टी, जोड कांदे व सुपर माल अशी प्रतवारी कांद्याची प्रतवारी केली जाते. दर्जेदार ४५ ते ६५ मिमी आकाराच्या कांद्याची निवड सुपर माल म्हणून केली जाते.

Onion Storage | Mukund Pingle

कांदा चाळ व्यवस्थापन

कांदा चाळीत तळभागात विटा ठेवल्या जातात. त्यावर ठरावीक अंतर ठेऊन कांदा पसरला जातो. त्यामुळे हवा खेळती राहते. विटा पाणी शोषून घेत असल्याने सड होण्याचे प्रमाण कमी होते.

Onion Storage | Mukund Pingle

कांदा सड उपाययोजना

पावसाळ्यात कांदा भिजणार नाही यासाठी चारही बाजूने बारदान्याचा वापर केल्या जातो. आर्द्रता वाढल्यास चाळ बंद तर दमट वातावरणात खुली केली जाते.

Onion Storage | Mukund Pingle
Khillar Breed | Agrowon