Linseed Use : जवस आरोग्यासाठी फायदेशिर

Team Agrowon

जवसापासून चटणी, चिक्की या अन्नपदार्थांमध्ये जवसाचा वापर करून त्यांचे आहारातील प्रमाण वाढवून त्यापासून मिळणारे अनेक आरोग्यदायी फायदे घेता येतात. व्यवसायिक दृष्टीने जवस फूड कॅप्सूल, टॅबलेट, जवस पीठ या पदार्थांच्या रूपात उपलब्ध आहे.

Linseed | Agrowon

जवसातील पोषक मूल्य पाहता जवस, राजगिरालाही, गुळ, मध, इलायची आणि गवार डिंक या सर्व घटकांचा वापर करून जवस न्यूट्रा लाडू तयार करता येतात. ज्याप्रमाणे बुंदी, बेसन, खोबरे आणि डिंकाचे लाडू बाजारामध्ये उपलब्ध आहेत.

Linseed | Agrowon

आरोग्यदायी जवसाचे लाडू तयार करून बाजारामध्ये आणले पाहिजेत. जवस न्युट्रा लाडू तयार करण्यासाठी जवस चांगले भाजून त्याची पूड तयार करावी. यामध्ये राजगिरालाही, गूळ, गवार डिंक, मध आणि विलायची पूड मिसळून गोल आकाराचे लाडू बांधावेत.

Linseed | Agrowon

जवसाच्या बियापासून खाद्य तेल आणि औद्योगिक तेलाच्या उत्पादनासाठी ८० टक्के केला जातो.झाडापासून मिळणाऱ्या तंतूचा उपयोग कापड व्यवसाय, वेगवेगळ्या प्रकारचे कागद तयार करण्यासाठी व शोभेच्या वस्तू निर्मितीकरिता उपयोग होतो.

Linseed | Agrowon

जवसाच्या तंतूपासून पक्के दोरखंड, पोते, पिशव्यांची निर्मिती केली जाते. पूर्वीपासून तेलाचा उपयोग तेलरंग, वार्निश, साबण, छपाईची शाई, वंगण, मलम, चमड्याच्या पॉलिशसाठी होतो.

Linseed | Agrowon

जवसाच्या पेंढीचा उपयोग पशू खाद्यात केला जातो.

Linseed | Agrowon

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.