American Army Worm : ज्वारीवरील अमेरिकन लष्करी अळीची लक्षणे कशी ओळखाल?

Team Agrowon

या किडीच्या प्रामुख्याने अंडी, अळी, कोष आणि पतंग या चार अवस्था असतात. त्यातील अळी अवस्था ही खूप नुकसानकारक असते.

American Army Worm | Agrowon

पिकाच्या जवळील जमिनीत अळीचा कोष अवस्थेचा काळ हा साधारण १ आठवडा ते १ महिन्यापर्यंत असू शकतो.

American Army Worm | Agrowon

मादी पतंग साधारणपणे १००० ते १५०० हिरवट पिवळसर रंगाची अंडी समूहाने पानावर, पोंग्यामध्ये घालते. त्यावर लोकरी केसाळ पुंजक्याचे आवरण घातले जाते. अंड्याचा रंग १२ तासानंतर गडद तपकिरी होतो.

American Army Worm | Agrowon

हवेतील आर्द्रता ७५ टक्क्यांपेक्षा जास्त, कमी सूर्यप्रकाश व हिवाळा या बाबी अळीच्या वाढीसाठी पोषक आहेत.

American Army Worm | Agrowon

लहान अळ्या पानांचा हिरवा भाग खरवडून खातात. त्यामुळे पानावर पांढरे पट्टे दिसून येतात.

American Army Worm | Agrowon

मोठी अळी ही पोंग्यामधील पाने खाते, पानांना छिद्र पाडते. अळीने पोंगा खाल्ल्याने पिकाची वाढ खुंटते. परिणामी, उत्पादन घट येते.

American Army Worm | Agrowon
Marigold Cultivation | Agrowon