Cashew Rate : काजू बी दरात किती झाली सुधारणा?

Team Agrowon

काजू बी ला किती दर?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू बी दरात प्रतिकिलो ५ ते १० रुपयांनी सुधारणा झाल्यामुळे जिल्ह्यात सध्या ११० ते ११५ रुपयांनी काजू बी खरेदी सुरू आहे. काजू बीची आवक कमी झाली असल्यामुळे पुढील आठवड्यात दर आणखी सुधारण्याची शक्यता आहे.

Cashew Rate | Agrowon

सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. जिल्ह्याच्या काही भागात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून काजू हंगामाला प्रारंभ झाला.

Cashew Rate | Agrowon

हंगामाच्या सुरुवातीला प्रतिकिलो ११५ रुपये काजू बी चा दर होता.

Cashew Rate | Agrowon

आधी किती होता दर?

पहिल्या महिनाभरात अपेक्षित उत्पादन न आल्यामुळे काजू बी च्या दरात काहीशी वाढ झाली. दर आठवड्याला पाच ते दहा रुपयांनी वाढ होत असून काजू बी चे दर १२५ ते १३५ रुपयांवर पोहोचले.

Cashew Rate | Agrowon

१० मार्चनंतर काजू बी ची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे काजू बी च्या दरात घसरण होण्यास सुरुवात झाली. गेल्या आठवड्यापर्यंत हे दर प्रतिकिलो १०० रुपयांपर्यंत आले होते.

Cashew Rate | Agrowon

सावंतवाडी-दोडामार्ग फळबागायतदार संघ, वैभववाडी काजू बागायतदार संघ यांनी शासनाकडे गोव्याप्रमाणे १५० रुपये हमीभाव मिळावा मागणी केली.

Cashew Rate | Agrowon

काजू बीला दर नसल्याने काही ठिकाणी आंदोलनेदेखील करण्यात आली. परंतु दरात सुधारणा झाली नव्हती.

Cashew Rate | Agrowon

उत्तम दर्जाचा काजुला प्रतिकिलो १५ रुपयेदेखील वाढवून दिले जात आहेत. काजू हंगाम अंतिम टप्प्यात असल्यामुळे पुढील आठवड्यात काजू बी ची आवक अजूनही कमी होणार असल्यामुळे दरात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे.

Cashew Rate | Agrowon
Ragi | Agrowon