Livestock: हंडरगुळी बाजारचं नातं संपलं!

महारुद्र मंगनाळे

परवा हंडरगुळीच्या बाजारला गेलो होतो.आमच्या एक वर्षे वयाच्या देवणी खोंडाला जोडीदार खोंड घ्यायचा होता.

Livestock | Maharudra Mangnale

सकाळी त्याला टेम्पो मध्ये टाकण्यापासून ते बाजारात उतरेपर्यंत त्याने आमचे बेहाल केले.

Livestock | Maharudra Mangnale

चालक संगम,आमचे शेजारचे शेतकरी मित्र मंगेश सारोळे व मी असे तिघेजण होतो.पहिल्यांदाच गोठा सोडला असल्याने,ते थांबायला तयार नव्हतं.

Livestock | Maharudra Mangnale

वयाच्या दहा-बारा वर्षांपासून मी हंडरगुळीचा जनावरांचा बाजार बघतोय.सुरूवातीला वडिलांसोबत,नंतर पत्रकार म्हणून आणि गेली बारा वर्षे म्हशीपालक म्हणून.

Livestock | Maharudra Mangnale

या सुमारे ५० वर्षांत जनावरांच्या बाजारात कसल्याच सुविधा निर्माण झाल्या नाहीत.अख्ख्या बाजारात जनावरांसाठी सोडा,माणसांना बसायलासुध्दा शेड नाही,एकही निवारा नाही की झाड नाही.

Livestock | Maharudra Mangnale

म्हशींचा बाजार तर हागणदारीतच भरतो.जनावरांना पिण्याच्या पाण्याचा हौद नाही.तेव्हाही आणि आताही घागरीवर पाणी विकत घेऊन जनावरांना पाजावं लागतं. तेव्हा चहा,नाष्त्याच्या जशा टपऱ्या होत्या तशाच आजही आहेत.

Livestock | Maharudra Mangnale

तेव्हा जसा बेक्कार चहा मिळायचा तसाच आजही मिळतो.तेच भजे,तोच चिवडा आणि च्या.पाच-सहा राज्यातून शेकडो व्यापारी,खरेदीदार, शेतकरी इथं येतात पण एकही चांगलं हॉटेल नाही.बाजारात शेणा-मुताच्या मातीवर सतरंजी नाही तर एखादं पटकूर अंथरूण त्यावर डब्बे सोडून माणसं जेवतात .वर्षानुवर्षांची त्यांची ही सवय आहे.त्यांचाही नाईलाज आहे.

Livestock | Maharudra Mangnale
Bajari | Agrowon