Caravan Dog : शेताच्या राखणीसाठी अस्सल भारतीय कारवान श्‍वान

Team Agrowon

महाराष्ट्रात बऱ्याच यात्रेच्या ठिकाणी श्‍वानांच्या धावण्याच्या शर्यतीत कारवान जातीचे श्‍वान निवडले जातात.

Caravan Dog | Agrowon

या जातीला कोणत्याही विशिष्ट आहाराची आवश्यकता नसते. स्वयंपाकगृहात बनवलेला रोजचा आहार त्यांना चालतो. आहार उच्च-गुणवत्तेचा असेल तर त्यांचे आरोग्य सुधारते.

Caravan Dog | Agrowon

आहारामुळे उद्‌भवणारी कोणतीही आरोग्य समस्या नाही. श्‍वानांना घरी बनवलेली भाकरी, पोळी, भातासोबत डाळ किंवा मांस मिसळून द्यावे. बाजारातील विकतचे श्‍वान खाद्य यांना देण्याची आवश्यकता नाही.

Caravan Dog | Agrowon

श्‍वानांना मोकळे ठेवण्याची गरज आहे, त्यामुळे त्यांना व्यायाम मिळतो, ते सक्रिय राहतात. त्यासाठी कुंपण घातलेले अंगण अत्यंत उपयुक्त असते.

Caravan Dog | Agrowon

श्‍वानांना जास्त काळजीची आवश्यकता नसते, ते स्वतःला स्वच्छ ठेवण्याचे चांगले काम करतात श्‍वान अत्यंत निरोगी असतात. कोणत्याही आनुवंशिक आजारास बळी पडत नाहीत.

Caravan Dog | Agrowon

कोणत्याही परिस्थितीत ही जात चांगल्या प्रकारे तग धरते. रेबीज आजाराच्या नियंत्रणासाठी वर्षातून एकदा लसीकरण आवश्यक आहे.

Caravan Dog | Agrowon
Kolhapur Ambabai Rathotsav 2023 | Agrowon