Summer Sowing : यंदाच्या उन्हाळी हंगामात मुगाला मिळतेय पसंती

Team Agrowon

उन्हाळी हंगामात कडधान्य पिकांची लागवड वाढली. आतापर्यंत देशात १७ लाख ५७ हजार हेक्टरवर उन्हाळी पिकांची लागवड झाली. तर गेल्याहंगामात याच काळातील लागवड १६ लाख २३ हजार हेक्टरवर होती. कडधान्यामध्ये मुगाला सर्वाधिक पसंती मिळत आहे.

Summer Sowing | Agrowon

मुगाची सर्वाधिक १४ लाख २७ हजार हेक्टरवर लागवड झाली. मागील हंगामात १२ लाख ८३ हजार हेक्टरवर लागवड दिसत होती. तर उडदाची लागवड मात्र काहीशी घटली आहे.

Summer Sowing | Agrowon

यंदा उडदाखाली ३ लाख ८ हजार हेक्टर क्षेत्र आहे. मागील हंगामात याच काळातील लागवड ३ लाख १२ हजार हेक्टर होती.

Summer Sowing | Agrowon

भरडधान्यामध्ये उन्हाळी लागवडीत मक्याला पसंती मिळाली. भरडधान्याखाली सध्या १० लाख ८६ हजार हेक्टर क्षेत्र आहे. गेल्या हंगामात याच काळातील लागवड १० लाख १९ हजार हेक्टरवर होती. मक्याची ६ लाक ३० हजार हेक्टरवर लागवड झाली.

Summer Sowing | Agrowon

उन्हाळी हंगामात तेलबिया लागवड मात्र घटली आहे. तेलबिया पिकांची लागवड यंदा ९ लाख ४० हजार हेक्टरवर झाली.

Summer Sowing | Agrowon

यंदाच्या हंगामात कडधान्य आणि भरडधान्य पिकांना पसंती मिळताना दिसत आहे. तर यंदा भात आणि तेलबिया पिकांची लागवड कमी झाली.

Summer Sowing | Agrowon
Khillar Breed | Agrowon