Soybean Rate: सोयाबीनचे दर वाढण्याचा अंदाज

Anil Jadhao 

आंतरराष्ट्रीय बाजारात आजही सोयाबीनच्या दरात चढ उतार सुरु होते. शुक्रवारी सोयाबीनचे वायदे १५.२७ डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले होते. रुपयात हा दर ४ हजार ५८२ रुपये होतो.

आज बाजार सुरु झाल्यानंतर दर काहीसे कमी झाले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत आज सोयाबीनचे वायदे १५.१७ सेंटवर होते. म्हणजेच वायदे ४ हजार ५५२ रुपये प्रतिक्विंटलवर पोचले होते.

आंतरराष्ट्रीय  बाजारात सोयाबीन आणि सोयापेंड तेजीत असतानाही देशातील सोयाबीन दर  मात्र स्थिर आहेत. आजही सोयाबीनला ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपये दर मिळाला.

मागीलवर्षीचा साठा आणि यंदाची खरेदी यामुळं उद्योगांची गरज भागत होती. त्यामुळं बाजारातील आवक कमी असूनही उद्योगांची गरज भागत होती. परिणामी देशातील दर स्थिर होते.

आता उद्योगांकडील साठा कमी झाला. त्यामुळं उद्योगांना खरेदीत उतरावे लागेल. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनला मागणी वाढण्याचाही अंदाज आहे.

पुढील काळात सोयाबीनला ५५०० ते ६ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी ५५०० रुपयांपेक्षा कमी दरात सोयाबीनची विक्री करु नये, असं आवाहन सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी केलंय.