Mini Tractor : तरुणानं अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी बनवला मिनी ट्रॅक्टर, पॉवर वीडर

Team Agrowon

योगेश यांनी लहान शेतकऱ्यांसाठी खास मिनी ट्रॅक्टर विकसित केला आहे. त्यात चार फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स गिअर वापरला आहे. सामान्यतः गिअर हे इंजिनशी जोडलेले असल्यामुळे आवश्यक ती ताकद मिळवण्यामध्ये अडचणी येतात.

Mini Tractor | Vinod Ingole

शेतकऱ्यांची ही अडचण दूर करण्यासाठी योगेश यांनी इंजिन आणि गिअर विभाग स्वतंत्र ठेवले असून, चेनव्हिलद्वारे जोडले आहे. केवळ या एकाच बदलामुळे ट्रॅक्टर चार्जिग मोटार, पेट्रोल किंवा डिझेल इंजिन या पैकी काहीही जोडून चालवता येत असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यासाठी केवळ इंजिनचा विभाग बदलण्याची आवश्यकता भासते.

Mini Tractor | Vinod Ingole

-सध्या त्यांनी विकसित केलेल्या मिनी ट्रॅक्‍टरची क्षमता पाच हॉर्सपावर आहे. यामध्ये गिअर बॉक्‍स, डिप्रेन्शियल, क्‍लचप्लेट, प्रेशरप्लेट, अप आणि डाऊन करण्यासाठी मॅन्युअली हायड्रोलीक यंत्रणा दिली आहे.
- हा मिनी ट्रॅक्टर तीन लिटर डिझेलमध्ये सहा तास काम करू शकतो.
- त्याला कल्टीवेटर, वखरपास जोडून कामे करता येतात.

Mini Tractor | Vinod Ingole

- तीन बाय पाच फूट आकाराची छोटी ट्रॉली जोडून, पाच क्‍विंटलपर्यंत भार वाहून नेता येतो. ही ट्रॉली १९ हजारापर्यंत पडते.
- या पाच एचपी डिझेल इंजिनसह असलेल्या मिनी ट्रॅक्‍टरची किंमत ७५ हजार रुपये इतकी आहे. कोणत्याही इंजिनशिवाय मिनी ट्रॅक्टर ५५ हजार रुपये मिळू शकतो. त्यावर पेट्रोल इंजिन किंवा बॅटरी लावणे शक्य होते.

Mini Tractor | Vinod Ingole

पावर विडर
आंतरमशागत आणि तण नियंत्रणासाठी पॉवर वीडर तयार केले असून, त्यातही इंजिनचा विभाग गरजेनुसार बदलता येतो. त्यामुळे पेट्रोल किंवा डिझेल अशा उपलब्ध किंवा स्वस्त इंधनाचा वापर करता येतो.

तीन लिटरमध्ये ५.५ ते ६ तास काम करणे शक्य आहे. कल्टीवेटर, वखरपास, रोटाव्हेटर अशी तीनही कामे करता येतात. याची किंमत ५० हजार रुपये आहे.

Mini Tractor | Vinod Ingole
Grape | Agrowon