Team Agrowon
जनावरांच्या आहारात अॅझोलाचा वापर केल्यामुळे दुग्ध उत्पादनात १५-२० टक्के वाढ होते.
अॅझोलामध्ये अत्यावश्यक अमिनो अॅसिड, क्लोरोफिल अ आणि ब, खनिजे, जीवनसत्त्वे, ब कॅरोटीन तसचं ३५ टक्के प्रथिने असतात
प्रचलित पशुखाद्यावरील खर्च २०-२५ टक्के कमी होतो.
नत्र स्थिरीकरणाच्या गुणधर्मामुळे आणि नत्राच्या अधिक प्रमाणामुळे हिरवळीचे खत म्हणून देखील अॅझोलाचा वापर होतो.
दुभत्या जानावारासोबातच अॅझोला ब्रॉयलर तसेच लेअर कोंबड्यानाही योग्य मात्रेत दिल्यास उत्पादनात वाढ होते.
शेळ्या, मेंढ्या, वराह यांनाही अॅझोला पुरविल्यास त्यांची चांगली वाढ होते. अॅझोला उत्पादनावरील खर्च अत्यंत कमी असून कमी जागेत जास्त उत्पादन घेता येतं.