मुक्त संचार गोठ्यातून मिळते उच्च प्रतीचे खत

मुक्त संचार गोठ्यात जनावरांचे संगोपन करत असताना शेतकऱ्यांचे कष्ट देखील कमी होतात. यासोबतच जनावरांचे आरोग्य उत्तम राहून, दूध उत्पादनात वाढ दिसून येते.
Loose Housing System of Dairy Animals
Loose Housing System of Dairy Animals Agrowon

आपल्याकडील शेतकरी खूप वर्षापासून पारंपरिक पद्धतीने दुग्धव्यवसाय (dairy farming) करतायेत. पारंपरिक पद्धतीमुळे शेतकऱ्यांकडील दुधाळ जनावरांची संख्या मर्यादित राहिली. सोबतच गायी-म्हशीची दूध देण्याची क्षमताही वाढलेली दिसून आली नाही. यामुळे शेतकऱ्यांकडील उत्तम वंशावळीची दुधाळ जनावरांची (milch animals) संख्या मर्यादितच राहिली.

शेतकऱ्यांनी दुधाळ जनावरांची संख्या मर्यादित ठेवण्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मजुरांची कमतरता. पण मुक्त संचार गोठ्यात मजुरांचा प्रश्नच निर्माण होत नाही. मुक्त संचार गोठ्यात जनावरांचे संगोपन करत असताना शेतकऱ्यांचे कष्ट देखील कमी होतात. यासोबतच जनावरांचे आरोग्य उत्तम राहून, दूध उत्पादनात (milk production) वाढ दिसून येते.

Loose Housing System of Dairy Animals
असा असावा जनावरांचा गोठा !

एका गायीला किंवा म्हशीला मुक्त संचार गोठ्यात मोकळे सोडण्यासाठी कमीत कमी १५० ते २०० चौरस फुट जागेची गरज असते. याचाच अर्थ एक गुंठा जमिनीत आपण पाच मोठी जनावरे मोकळी सोडू शकतो.

Loose Housing System of Dairy Animals
कमी खर्चातील मुक्त संचार गोठा

पारंपरिक पद्धतीच्या गोठ्यामध्ये शेतकऱ्यांना दिवसातून दोन ते तीन वेळा शेण उचलावे लागते. मुक्त संचार गोठ्यामध्ये मात्र दोन महिन्यातून एकदा किंवा पावसाळ्याआधी शेणखत काढले जाते. यामध्ये जनावरांचे मुत्र मिसळले गेल्याने तसेच जनावरांच्या खुरांनी हे खत तुडविले गेल्याने उत्तम प्रतीचे गोखूर खत मिळते. जमिनीची सुपीकता, सेंद्रिय कर्ब आणि पीक गुणवत्ता वाढविण्यासाठी हे खत उपयुक्त आहे.

पावसाळ्यात मात्र मुक्त संचार गोठ्यामध्ये दररोज शेणखत उचलावे लागते. पावसाळ्यात मुक्त संचार गोठ्यात जनावरे फिरत असताना त्यांची बसण्याची जागा, खुरे ओली राहणार नाहीत याची विशेष खबरदारी घ्यावी लागते.

पावसाळ्यात मुक्त संचार गोठ्यात जनावरे मोकळी सोडली तर जास्त घाण होतात. कासेचा दाह यांसारखे आजारांची बाधा होऊ शकते. पाऊस चालू असताना जनावरे शक्यतो बांधून ठेवतात. पाऊस थांबल्यानंतर गोठ्यातील जागा कोरडी होईपर्यंत त्यांना मोकळे सोडत नाहीत. पावसाळ्यात मुक्त संचार गोठ्यात शेण दररोज उचलावे लागते. त्यामुळे मुक्त गोठ्यात पावसाळ्यात जरा जास्त काम लागते. त्यामुळे पावसाळ्यात गोठ्याची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे.

Loose Housing System of Dairy Animals
मुक्त व्यवस्थापनात शेळीपालन करावे का?

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com