Lumpy Skin Vaccination : ‘पशुवैद्यकीय’चे १४ कर्मचारी ‘नो सुट्टी, ओन्ली ड्यूटी’वर

अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने १४ कर्मचाऱ्यांना ‘नो सुट्टी ओन्ली ड्युटी’ असे म्हणत काम करावे लागत आहे.
Lumpy Skin Vaccination
Lumpy Skin VaccinationAgrowon

शिराळा, जि. सांगली ः तालुक्यात अपुरे कर्मचारी असतानाही खासगी सहकाऱ्यांच्या मदतीने वेळेत लम्पी स्कीनचे (Lumpy Skin Vaccination) १०० टक्के लसीकरण केल्याने जिल्ह्यासह इतर तालुक्यांच्या तुलनेत शिराळा तालुक्यात ३ टक्के जनावरांना लम्पी स्कीनची (Lumpy Skin Infection) बाधा झाली.

अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने १४ कर्मचाऱ्यांना ‘नो सुट्टी ओन्ली ड्युटी’ असे म्हणत काम करावे लागत आहे. वेळेत लसीकरण केल्याने लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यास मदत झाली. जिल्ह्यात लम्पी स्कीनची बाधा होण्याचे व मृत्यूचे प्रमाण सर्वांत कमी आहे.

Lumpy Skin Vaccination
Lumpi Skin : ‘लम्पी स्कीन’च्या औषधोपचारासाठी २ कोटींचा निधी राखीव

शिराळा तालुका डोंगरी म्हणून ओळखला जातो. येथे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. गाय व म्हैसपालन केले जाते. गाय वर्गात लम्पी स्कीनचा आजार वाढू लागला आहे. तालुक्यात २६ हजार ३६९ गाय वर्ग संख्या आहे.

Lumpy Skin Vaccination
Lumpy Skin : भाईंदरमध्ये आठ वासरे लम्पीग्रस्‍त

शिराळा, सागाव, चरण, बिळाशी, येळापूर, आरळा, कोकरूड, वाकुर्डे, टाकवे, गुढे, तडवळे, चिखली, मांगले, करमाळे, मणदूर, शिरशी, पणुंब्रे, इंगरूळ, रिळे असे १९ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. फिरता पशुवैद्यकीय दवाखाना आहे. २७ कर्मचाऱ्यांची गरज असताना फक्त १५ कर्मचारी कामावर असून १२ पदे रिक्त आहेत.

लम्पी स्कीनची लागण झालेली जनावरे ८७९ (३ टक्के)

बरी झालेली जनावरे ४७२ (५३ टक्के)

मृत्यू झालेली जनावरे ६५ (७ टक्के)

उपचार सुरू असलेली जनावरे ३३९ (३८ टक्के)

सर्व शेतकऱ्यांनी ‘माझा गोठा स्वच्छ गोठा’ योजनेत सहभागी होऊन लम्पी स्कीन आजार हटवावा. लागण झालेल्या जनावरांसाठी गोठ्यात फवारणीसाठी औषध मोफत उपलब्ध असून आजाराचा प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून औषध शासकीय शुल्क भरून मिळेल.

- डॉ. सतीश जाधव, पशुधन अधिकारी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com