Animal Disease : जनावरांमध्ये सर्रा, पीपीआर आजारांचा प्रादुर्भाव

कधी प्रचंड उकाडा, तर कधी मुसळधार पाऊस अशा विचित्र वातावरण बदलाचा परिणाम मनुष्याप्रमाणेच मुक्या जनावरांवरही होत आहे.
Animal Care
Animal CareAgrowon

Animal Health News : कधी प्रचंड उकाडा, तर कधी मुसळधार पाऊस अशा विचित्र वातावरण बदलाचा (Climate Change) परिणाम मनुष्याप्रमाणेच मुक्या जनावरांवरही होत आहे. सध्या जिल्ह्यातील काही भागांमध्ये गाई, म्हशींमध्ये सरा आणि शेळ्या-मेंढ्यांमध्ये पीपीआर आजारांचा (Animal Disease) प्रसार होताना दिसत आहे.

Animal Care
Animal Care : आयोडीन कमतरतेमुळे जनावरांवर काय परिणाम होतो?

बाहेरील राज्यातून जिल्ह्यात स्थलांतरित होणाऱ्या जनावरांच्या माध्यमातून या आजारांचा प्रसार होत असल्याचे पशुपालकांचे म्हणणे आहे. आजारामुळे जनावरांमध्ये अशक्तपणा दिसत आहे. पशुपालकांनी या आजारावर नियंत्रण आणि उपचारासाठी पशुसंवर्धन विभागातील तज्ज्ञांशी संपर्क साधला आहे.

Animal Care
Animal Care : उन्हाळ्यात जनावरांच्या आरोग्यावर काय परिणाम होतात?

सध्याच्या काळात मध्य प्रदेश, राजस्थानातून अमरावती जिल्ह्यात जनावरांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते. तेथील पशुपालकांकडून जनावरांचे योग्य व्यवस्थापन होत नाही. त्यामुळे या जनावरांकडून सध्याच्या काळात प्रतिकूल वातावरणात आजारांचा प्रसार होत आहे.

- रवी पाटील, पशुपालक

जनावरांमध्ये अशक्तपणा येऊन त्यांची प्रतिकारशक्ती कमी झालेली आहे. दोन तालुक्यांमध्ये जनावरांचे लसीकरण झाले आहे. ज्या फार्मवरील गायींमध्ये आजाराचा प्रसार दिसून आलेला आहे, तेथे उपाययोजना सुरू आहेत.

- डॉ. पुरुषोत्तम सोळंके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com