गोठ्यातलं वातावरण दुषित करतो अमोनिया वायू!

पावसाळ्यातील वातावरण अनेक रोगजंतूंच्या वाढीस आणि प्रसारास पोषक असते. पावसाळ्यात दमट वातावरणामुळे जनावरांना विविध रोगांची बाधा होत असते.
rainy season diseases and prevention in animals
rainy season diseases and prevention in animalsAgrowon

दमट वातावरणात वासरे, करडे, कोकरे विविध प्राणघातक आजारांना (disease) बळी पडण्याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात जनावरे पावसाच्या पाण्यात भिजू नयेत म्हणून, शेतकरी जनावरे गोठ्यातच बांधून ठेवतात. जनावरांच्या शेणातून अमोनिया वायू बाहेर पडत असतो. जनावरांचे शेण (cow dung) गोठ्यातच पडल्याने अमोनिया (Ammonia) वायुचे गोठ्यातील प्रमाण वाढत असते.

कोंंदट वातावरणामुळे वायूविजनही नीटसं होत नाही. परिणामी अमोनिया वायू गोठ्यातच साचून राहतो. अमोनिया वायुचा परिणाम जनावरांच्या श्वसनसंस्थेवर परिणाम होत असतो. अमोनिया वायू जनावरांच्या श्वसननलिकेद्वारे फुफ्फुसात प्रवेश करतो.

rainy season diseases and prevention in animals
असा असावा जनावरांचा गोठा !

जनावरांच्या फुफ्फुसात विशेषकरून लहान वयाची वासरे, करडे, कोकरांच्या श्वसननलिकेत कफ साचू लागतो. वासरांना सर्दी होते. नाकपुडीतून पाणी बाहेर येते. तीव्र स्वरूपाचा कफ असल्यास वासरांना श्वास घेण्यास त्रास होतो. शेळ्यांचे खाण्या-पिण्यावर लक्ष लागत नाही. दमट वातावरणात त्यांना थंडी वाजू लागते. पावसाळ्यात बहुतांशी करडांना निमोनिया सारख्या आजाराची बाधा झालेली दिसून येते.

rainy season diseases and prevention in animals
कमी खर्चातील मुक्त संचार गोठा

पावसाळ्यात कोवळं, हिरवं लुसलुशीत गवत जास्त प्रमाणात खाल्ल्याने शेळ्यांना जंताचा प्रादुर्भाव होत असतो. जंताने बाधित शेळ्यांना सांसर्गिक फुफ्फुसदाहची लागण लवकर होते. त्यामुळे पावसाळ्यात शेळ्यांचे आणि गोठ्याचे योग्य व्यवस्थापन गरजेचं आहे. पावसाळ्यात गोठा हवेशीर आणि कोरडा राहील याची विशेष काळजी घ्यावी. त्यांना सकस आहाराचा पुरवठा करावा. तज्ज्ञ पशुवैद्यकाची मदत घेऊन वेळोवेळी शेळ्यांची, करडांची आरोग्य तपासणी करावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com