Dairy Business : दुग्ध व्यवसायाकडे तरुणांनी संधी म्हणून पाहा

सहकार, शिक्षण क्षेत्राबरोबरच इतरही समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, मात्र शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे तरुणांनी संधी म्हणून पाहिले पाहिजे.
Dairy Business
Dairy BusinessAgrowon

Nashik News : सहकार, शिक्षण क्षेत्राबरोबरच इतरही समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, मात्र शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे तरुणांनी संधी म्हणून पाहिले पाहिजे, असे प्रतिपादन नवनिर्वाचित नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी केले.

सिन्नर तालुक्यातील आभार दौऱ्याप्रसंगी येथील श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेला त्यांनी भेट दिली. या वेळी ते म्हणाले, की आधुनिकतेची कास धरून दूग्ध व्यवसाय कसा वाढविला पाहिजे याचे प्रशिक्षण घेतले पाहिजे.

Dairy Business
Buffalo Milk Fat : म्हशींची संख्या घटल्यामुळे देशात दुधावरची मलई आटली

आज आपण महागडी जनावरे घेऊन पाहिजे तसे दुधाचे उत्पादन घेत नाही. त्यामुळे गावातील तरुणांचा दूध व्यवसायाचा अभ्यासदौरा घडवून आणावा. सहकारामुळेच गावाचा, तालुक्याचा विकास शक्य आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेरला सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे संगमनेरचा सर्वांगीण विकास झाला असल्याचे त्यांनी नमूद केले.

सिन्नर तालुक्यातील पतसंस्थांची माहिती जाणून घेत श्रीमंतच्या कारभारावर त्यांनी समाधान व्यक्त केले. सहकार क्षेत्रात काम करण्यासाठी कायम सोबत असल्याचे त्यांनी नमूद केले.

संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष नारायण वाजे, उपाध्यक्ष अरुण वारुंगसे, व्यवस्थापक अय्युब शेख यांनी स्वागत करत सत्कार केला. गणेश वाजे यांनी परिचय करून दिला. प्रा. एकनाथ माळी यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष अरुण वारुंगसे यांनी आभार मानले.

या वेळी शंकरराव वामने, अॅड. प्रदीप वारुंगसे, महेश कुटे, अंबादास वाजे, डॉ. रामदास नाईकवाडी, अशोक गवळी, शरद माळी, अर्जुन वाजे, सुनील सोनवणे, प्रवीण वामने, प्रा. रामदास वारुंगसे, नवनाथ ढोली, वामने, प्रा. दीपक वाजे आदींसह पतसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com