Animal Care : प्रतिजैविकाबाबत जागरूक रहा

सूक्ष्म जिवाणूंचा वाढता प्रसार लक्षात घेता अनेक राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय संस्था एकात्मिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून प्रतिजैविकांच्या प्रतिरोधासाठी प्रयत्न करत आहेत.
Animal Welfare
Animal WelfareAgrowon

डॉ. एम. एस. बुधे

डॉ. आर. पी. कोल्हे

सूक्ष्म जिवाणूंचा वाढता प्रसार लक्षात घेता अनेक राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय संस्था एकात्मिक आरोग्याच्या(Animal Welfare) दृष्टिकोनातून प्रतिजैविकांच्या प्रतिरोधासाठी प्रयत्न करत आहेत. या अनुषंगाने प्रतिजैविकांच्या वापराबाबत जनजागृतीसाठी दरवर्षी १८ ते २४ नोव्हेंबर दरम्यान जागतिक प्रतिजैविक जागरूकता सप्ताह साजरा केला जातो.

Animal Welfare
CIBIL Agri Loan: शेती कर्जांना ‘सीबील’मधून वगळण्याच्या मागणी | ॲग्रोवन

जागतिक प्रतिजैविक जागरूकता सप्ताहाचे उद्दिष्ट हे प्रतिजैविक प्रतिकार दर्शविणाऱ्या सूक्ष्म जिवाणूंचा प्रसार थांबविण्यासाठी नागरिक, आरोग्य कर्मचारी, शेतकरी, पशुपालक आणि व्यावसायिकमध्ये जागरूकता आणि सर्वोत्तम पद्धतींना प्रोत्साहन देणे आहे. “एकत्रितपणे करूया प्रतिजैविक प्रतिकाराचा प्रतिबंध” हे यंदाच्या सप्ताहाचे घोष वाक्य आहे. नागरिक आणि आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांमध्ये प्रतिजैविक प्रतिरोधकतेबद्दल जागरूकता वाढवणे आवश्यक आहे.

जिवाणूंच्या संसर्गासाठी प्रतिजैविक, विषाणूजन्य संसर्गासाठी अँटिव्हायरल, बुरशीजन्य संसर्गासाठी अँटिफंगल्स आणि परजीवीमुळे होणाऱ्या संसर्गासाठी अँटिपॅरासायटिक्स यांचा समावेश होतो. अलीकडे प्रतिजैविकांचा अति वापर केल्यामुळे सूक्ष्म जिवाणूमध्ये प्रतिजैविकांच्या प्रभाव कमी होतो. प्रतिरोधक यंत्रणा एका जिवाणूंपासून दुसऱ्या जिवाणूंमध्ये प्रसारित होते

प्रतिजैविक हा जिवाणूंवर नियंत्रण आणण्याचा मर्यादित पर्याय आहे. ही औषधे महाग असतात .त्याचे दुष्परिणाम होतात. प्रतिजैविकास प्रतिरोधक तयार होण्याची कारणे अनेक आहेत. डॉक्टरांना सूचित न करता प्रतिजैविक घेणे टाळावे. आवश्यकतेनुसार योग्य औषध, योग्य मात्रा, मार्ग आणि योग्य कालावधी याचाही विचार करावा.

प्रतिजैविकांचा अयोग्य वापर इतर सामान्य वर्तन पद्धतीशी देखील संबंधित आहे. जसे की लिहून दिलेले औषधोपचार पूर्ण न करणे. प्रतिजैविकांसह आपण स्वतः मनात येईल ते औषधे घेणे, ज्यामध्ये नेहमीच अनावश्यक, अपुरा आणि अयोग्य मात्रा घेतली जाते. ज्यामुळे सूक्ष्म जिवाणू नष्ट होण्याऐवजी अनुकूल होण्यासाठी एक आदर्श वातावरण तयार करतात.

प्रतिजैविकांसह स्वयं-औषध हे जगाच्या अनेक भागात सामान्य आहे, विशेषत: विकसनशील देशांत जेथे नियामक प्रणाली शिथिल आहे जेथे प्रतिजैविक औषधे सर्रासपणे विकली जातात. प्रतिजैविक प्रतिकारशक्तीचे आर्थिक नुकसान मोजणे कठीण आहे. यामध्ये अनेक प्रकारचे परिणाम विचारात घेतले पाहिजेत. जसे की वाढलेल्या प्रतिकारामुळे अधिक महाग प्रतिजैविकांशी संबंधित खर्च जास्तीचा असतो. जेव्हा संक्रमण पहिल्या ओळीच्या प्रतिजैविकांना प्रतिरोधक बनतात, तेव्हा दुसऱ्या किंवा तिसऱ्या पातळीच्या औषधांचा वापर करावा लागतो, हे उपचार महाग असतात.

Animal Welfare
Grape Crop Damage : विनापरवाना तणनाशकाने द्राक्ष बागांचे नुकसान

जागतिक आरोग्य संघटनेची उद्दिष्टे

प्रतिजैविकांबाबत जनजागृती करणे

संशोधन आणि देखरेख वाढवणे

संक्रमण कमी करणे

प्रतिजैविक औषधे योग्य प्रकारे वापरणे

अनेक अभ्यासामध्ये असे दिसून आले, की सामान्य लोकांमध्ये प्रतिजैविकांविषयी माहिती नसते, विशेषत: जिवाणू आणि विषाणूंवरील प्रतिजैविकांच्या क्रियांबद्दल चुकीचे ज्ञान असते. जगभरात प्रतिजैविक प्रतिरोधकतेबद्दल आणि प्रतिजैविकांच्या प्रतिकूल परिणामांबद्दल लोकांमध्ये अपुरी जागरूकता आहे.

Animal Welfare
Farmer Incentive Scheme : पन्नास हजार शेतकरी‘प्रोत्साहन’च्या प्रतीक्षेत

अन्नउत्पादक प्राणी, मत्स्यपालनामध्ये वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोग उपचार किंवा प्रतिबंध यासाठी प्रतिजैविकांचा वापर बहुधा प्रतिकारशक्तीच्या एकूण समस्येमध्ये एक प्रमुख कारण आहे. प्राणी व पिकांच्या उत्पादनामध्ये प्रतिजैविकांचा वापर करण्यात येतो.

प्राण्यांमध्ये वाढ आणि उत्पादन प्रवर्तक म्हणून प्रतिजैविकांचा वापर.

प्रतिजैविक औषधांच्या वापरावरील नियमन आणि पर्यवेक्षणाचा अभाव.

काउंटर किंवा ऑनलाइन विक्रीमुळे प्रतिजैविकांची उपलब्धता.

निकृष्ट आणि खोट्या प्रतिजैविकांची उपलब्धता आणि वापर.

चांगल्या पद्धतींबद्दल जागरूकता नसणे.

शेतीमध्ये वापर

अन्न उत्पादक प्राणी (जलीय आणि स्थलीय) आणि वनस्पतींच्या रोगांवर उपचार करण्यासाठी प्रतिजैविक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ही औषधे आधीच आजारी असलेल्या प्राण्यांवर उपचार करण्यासाठी किंवा पिकांवरील रोगाचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी वापरली जातात. मत्स्यपालन व्यवसायात देखील (उदा. मत्स्यपालन) प्रतिजैविके वापरली जातात.

Animal Welfare
Crop Cover : क्रॉप कव्हरचा वापर

काही वेळा प्रतिजैविक पदार्थ वनस्पतींच्या रोगांवर उपचार करण्यासाठी वापरले जातात. रोगांना प्रतिबंध करण्यासाठी देखील प्रतिजैविकांचा वापर केला जातो.

- डॉ. एम. एस. बुधे, ९९२२६१५२५८

(सूक्ष्म जीवशास्त्र आणि पशू स्वास्थ विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय,

शिरवळ, जि. सातारा)

प्रतिजैविक प्रतिकारता ः एक जागतिक समस्या

आपल्या शेतीप्रणालीमध्ये प्रतिजैविक प्रतिरोधक सूक्ष्मजीव आपण सेवन करत असलेल्या अन्नामध्ये देखील असू शकतात. प्रतिजैविक प्रतिरोधक सूक्ष्मजीव आपल्या अन्नसाखळीमध्ये विकसित होतात. तसेच प्राणी, मानव आणि पर्यावरण यांच्यात फिरू शकते. जागतिक प्रतिजैविक जागरूकता सप्ताह हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे.

हा कार्यक्रम सार्वजनिक आणि आरोग्यसेवेमधील कर्मचाऱ्याला प्रतिजैविक प्रतिरोधकतेबद्दल सतर्क करतो. हा जागरूकता सप्ताह प्रतिजैविकांच्या मूलभूत गोष्टींबद्दल अधिक जाणून घेण्यास प्रोत्साहित करतो. आपण डॉक्टरांकडे जातो तेव्हा आपल्याला प्रतिजैविकांची पूर्ण माहिती असावी. ज्यामुळे डॉक्टरांना योग्य निदानापर्यंत पोहोचण्यास आणि योग्य उपचार सुरू करण्यास मदत मिळते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com