देशातील एकूण दूध उत्पादनात म्हशींच्या दुधाचा वाटा ५५ टक्के

भारत दूध उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे. उत्पादित एकूण दुध उत्पादनापैकी म्हशीपासून मिळणाऱ्या दुधाचे प्रमाण ५० टक्क्याहून अधिक जवळपास ५५ % आहे. मांस, दूध आणि शेतीकामअशा तिन्ही कामांसाठी ‘काळं सोनं’ म्हणून भारतीय म्हशींना संबोधले जाते.
Buffalo contribute more than 55 % in milk production
Buffalo contribute more than 55 % in milk production

भारत दूध उत्पादनात प्रथम (first) क्रमांकावर आहे. उत्पादित एकूण दुध (milk)  उत्पादनापैकी म्हशीपासून (buffalo) मिळणाऱ्या दुधाचे प्रमाण ५० टक्क्याहून अधिक जवळपास ५५ % आहे. मांस, दूध आणि शेतीकाम (draft) अशा तिन्ही कामांसाठी ‘काळं सोनं’ म्हणून भारतीय म्हशींना संबोधले जाते. दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी म्हशीच्या दुधाचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. त्यामुळे म्हशीपासून मिळणाऱ्या दुधाला मूल्यवर्धनाला जास्त वाव आहे.

हेही पाहा-  पंढरपुरी म्हैस कशी ओळखावी?

म्हशींच्या त्वचेचा रंग काळा, खुरे जाड असतात. म्हशीच्या शरीराची कातडी जाड असल्याने त्या पाण्यात,डबक्यात बसतात. म्हशी उष्णतेचा त्रास जास्त सहन करू शकत नाही.

म्हशींचेगुणसूत्रांवरून दोन प्रकार पडतात. गुणसूत्रांची (chromosome) संख्या २n= ५० असेल तर त्यांना पाणथळ म्हशी म्हणतात. या म्हशींचा वापर दूध उत्पादनासाठी केला जातो. ज्या म्हशींच्या गुणसुत्राची संख्या २n= ४८ असते त्या दलदलीत जाऊन बसतात. या म्हशी मांस, वाहतूक व शेतीकामासाठी वापरल्या जातात.

  • दुग्धजन्य पदार्थ बनविण्यासाठी म्हशींचे अधिक स्निग्धांश (fat) असलेले दूध वापरले जाते.
  • भारतात मुऱ्हा (Murrha), मेहसाणा (Mehsana), जाफराबादी (Jafarbadi), निली-रावी (Niliravi) या प्रजाती दुधासाठी प्रसिद्ध आहेत.
  • राज्यात पंढरपुरी, नागपुरी, मराठवाडी या जातीचे संगोपन केले जाते.  
  • म्हैसपालन व्यवसाय करताना जातिवंत म्हशींची निवड केली पाहिजे. म्हशींना योग्य प्रकारचा संतुलित आणि पोषक आहार दिला पाहिजे. म्हशींसाठी गोठ्याची रचना करताना ती आरामदायक अशी असावी. रोग नियंत्रणासाठी वर्षातून दोन वेळा लसीकरण केले पाहिजे.  

    Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

    ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    www.agrowon.com