Krishi Seva Kendra : घर बसल्या खत-बियाणे विक्री दुकानाचा परवाना कसा मिळवायचा?

Krishi Seva Kendra License : कृषी सेवा केंद्रांना परवान्यांसाठी आता अर्ज करण्यापासून ते परवाना मंजूरी मिळेपर्यंतचा सर्व टप्पा यापुढे ऑनलाइन करावा लागणार आहे.
krishi-seva-kendra
krishi-seva-kendra agrowon

Krishi Seva Kendra Online Apply : शेतकऱ्यांना पिकासाठी आवश्यक रासायनिक खते, कीटकनाशके, बी-बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रात जावे लागते. त्यामुळे जर तुम्ही गावामध्ये कृषी सेवा केंद्राचा व्यवसाय सुरू केल्यास चांगला नफा उत्पन्न मिळवता येतो. त्यासाठी आवश्यक असणारा परवाना मिळवणे अगदी सोपे झाले. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन अर्ज करून व्यवसायाची सुरुवात करु शकता.

ज्या शेतकऱ्यांना खताचे दुकान उघडायचे आहे त्यांनी यासाठी परवाना घेणे आवश्यक आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमातून शेतकऱ्यांना खत दुकान परवाना देण्याचे काम सरकार करते. कृषी विभागामार्फत बियाणे,खते,कीटकनाशके विक्रिसाठी परवाना दिला जातो.

krishi-seva-kendra
लिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द

अर्ज कसा करायचा?

1 . इच्छुकांनी aaplesarkar.mahaonline.gov.in या वेब साईट वर ऑनलाइन अर्ज करावा. प्रिंट काढावी.

2. फी किती आहे-

अ. नवीन बियाणे परवाना करीता रक्कम रु. 1000/-

ब. नविन खत परवान्या साठी 450/-

क. नविन कीटकनाशके परवाना करीता रक्कम रु. 7500/- .

3.परवाना वैधता कालावधी-

बियाणे- 5 वर्ष, नुतनीकरण फी- रु.1000/-.

खते- 5 वर्ष, नुतनीकरण फी (किरकोळ विक्रेता)- रु.450/-., घाऊक विक्रेता- रु. 2250/-.

कीटकनाशके- नुतनीकरण करण्याची आवश्यकता नाही.

4.अर्जदार पात्रता - कृषी पदविका 2 वर्षे ( पिक संरक्षण, पीक संवर्धन), बी.एस.सी. (कृषी), बी टेक., बी.एस.सी.(रसायनशास्त्र या विषयासह) इत्यादी पैकी एक शैक्षणीक अर्हता धारण केलेली असावी.

जर शेतकऱ्यांना ऑफलाइन अर्ज करायचा असेल, तर ते जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला म्हणजेच CSC (नजीकच्या कॉमन सर्व्हिस सेंटर) किंवा जिल्ह्यातील जिल्हा कृषी कार्यालयाला भेट देऊन खत आणि बियाणे स्टोअरसाठी अर्ज करू शकतात.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com