केंद्र सरकाच्या पॅकेजमुळे १.५ कोटी नोकऱ्या वाचल्या - पंतप्रधान नरेंद्र मोदी

आमच्या एमएसएमई क्षेत्रासाठी सरकारच्या ३ लाख कोटी रुपयांच्या योजनेमुळे साडेतेरा लाखांहून अधिक एमएसएमई उद्योगांना फायदा झाला आणि १.५ कोटी नोकऱ्या वाचल्या आहेत.
Narendra Modi
Narendra Modi

नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या ३ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमुळे जवळपास साडेतेरा लाख लघू, सुक्ष्म आणि मध्यम उद्योगांना (MSME's) मदत झाली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी (ता.७) संसदेत बोलताना सांगितले. राष्ट्रपतींच्या (President Of India) अभिभाषणावरील चर्चेदरम्यान बोलतना मोदींनी ही माहिती दिली.   

अर्थव्यवस्था जितनी ज्यादा Grow करेगी, उतने ही रोजगार के अवसर पैदा होंगे। पिछले 7 सालों में इसी पर हमारा फोकस रहा है, जिसका परिणाम है- आत्मनिर्भर भारत अभियान। pic.twitter.com/0hjmtzigg7

— Narendra Modi (@narendramodi)

लोकसभेत बोलताना मोदी म्हणाले (Modi In Loksabha) की, देशातील एमएसएमई (Micro Small and Medium Enterprises) उद्योगांना संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने ३ लाख कोटी रुपयांची योजना तयार केली. "आमच्या एमएसएमई क्षेत्रासाठी सरकारच्या ३ लाख कोटी रुपयांच्या योजनेमुळे साडेतेरा लाखांहून अधिक एमएसएमई उद्योगांना फायदा झाला आणि १.५ कोटी नोकऱ्या वाचल्या आहेत. आमच्या सरकारने एमएसएमईची व्याख्या बदलली आणि यामुळे या क्षेत्राला मदत झाली", एसबीआयच्या डेटाचा हवाला देत मोदींनी सांगितले. 

केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत (Aatmnirbhar Bharat) अभियानाअंतर्गत उत्पादनापासून ते सेवा क्षेत्रापर्यंत भारत जागतिक मूल्य साखळीचा भाग बनत आहे. एमएसएमई आणि सर्वात जास्त मनुष्यबळ असलेल्या वस्त्रोद्योग क्षेत्रावर (Textile Industry) आम्ही लक्ष केंद्रीत केल्याचे मोदींनी सांगितले. भारताची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर सर्वात वेगाने वाढणारी होती आणि जगाने देशाच्या आर्थिक प्रगतीची दखल घेतली आहे, मोदी म्हणाले.

देशाच्या निर्यातीत (India's Export) झालेल्या वाढीकडे लक्ष वेधताना कृषी, (Agriculture) मोबाईल, (Mobile) सॉफ्टवेअर आणि संरक्षण (Defence) यासह विविध क्षेत्रात भारताने सर्वाधिक निर्यात नोंदवल्याचेही मोदी म्हणाले. संरक्षण निर्यातीतही (Defence Export) भारताने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. देशाच्या आत्मनिर्भर भारत या दूरदृष्टीमुळेच हे घडले आहे. कोरोनासारखी महामारी असतानाही भारताच्या एकूण निर्यातीने विक्रमी टप्पा गाठला आहे, असे मोदी म्हणाले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com