गंगेच्या गाळात खतांचे गुणधर्म ?

गंगा नदीच्या गाळाचा वापर (Ganga River Sludge) खत म्हणून करता येईल. रासायनिक खतांच्या (Chemical Ferilizer)ऐवजी हे खत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देता येईल का? याची चाचपणी सध्या सुरु असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिलीय.
Govt to fortify “Ganga river sludge” for use as fertiliser
Govt to fortify “Ganga river sludge” for use as fertiliser

केंद्र सरकारने २०२२-२०२३ च्या अर्थसंकल्पात गंगा नदी पात्रालगत सेंद्रिय शेतीला  (Organic Farming) प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचा उल्लेख केला होता. तसेच रसायनमुक्त (Chemical free Organic Farming) सेंद्रिय शेतीचा पुरस्कार केला होता. त्यानुसार आता गंगा नदीच्या परिसरात सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यादृष्टीने गंगा नदीच्या गाळाला (Ganga River Sludge) खताचा (Fertilizer) दर्जा देण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव विचाराधिन आहे.

गंगा नदीच्या गाळाचा वापर (Ganga River Sludge) खत म्हणून करता येईल. रासायनिक खतांच्या (Chemical Ferilizer)ऐवजी हे खत शेतकऱ्यांना उपलब्ध करून देता येईल का? याची चाचपणी सध्या सुरु असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिलीय.

नदीपात्रातील पाण्यात फॉस्फरस आणि नत्राचे प्रमाण असते. या घटकांनी युक्त नदीतला गाळही खत म्हणून वापरला जाणे सहजशक्य असल्याचं नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगाचे (National Mission for Clean Ganga) महासंचालक अशोक कुमार यांनी म्हटलं आहे.   

त्यामुळंच गंगेतील गाळाला खत म्हणून प्रमाणित करण्यात यावं, ज्याचा वापर शेतकऱ्यांना शेतीकामात करता येईल, असा प्रयत्न सुरु असल्याचं सांगताना अशोककुमार यांनी, या गाळात खतांचे सगळे गुणधर्म आढळून आल्याचं नमूद केलं आहे. तसेच नदीपात्रात येणाऱ्या कचऱ्यात गायी म्हशींच्या शेणाचं प्रमाणही लक्षणीय असल्याचं कुमार म्हणालेत.

व्हिडीओ पहा- 

या अशा गाळात अधिक अशा गोष्टींची भर घातल्यास हे संमिश्रण रासायनिक खतांना (Chemical Ferilizer) उत्तम पर्याय म्हणून समोर येईल. सेंद्रिय शेतीसाठी (Organic Farming) शेतकऱ्यांना त्याचा वापर करता येईल, असा विश्वासही कुमार यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना केलाय. 

यादृष्टीने आम्ही काही कंपन्यांशी चर्चा करत असून हा गाळ प्रमाणित खत (Fortifies  Ferilizer) म्हणून सवलतीच्या दरात शेतकऱ्यांना देता यावा, असा प्रयत्न असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. 

यातून दोन उद्दिष्ट साध्य होणार आहेत. एक शेतकऱ्यांना रासायनिक  खतांना (Chemical Ferilizer)  पर्याय म्हणून हे खत देता येणार आहे, दुसरं म्हणजे या गाळाचे व्यवस्थापन होणार आहे. त्यासाठी आम्ही काही शेतकरी उत्पादक कंपन्यांशीही (Farmer Producer Orgnaisations) संवाद साधणार असल्याचं कुमार यांनी म्हटलं आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com