दुधापासून कशी बनवतात रबडी

दूध हे एक प्रकारचे सकस अन्न असून ते त्यातील प्रथिने आणि खनिजे उच्च प्रतीची असतात. केवळ दूध विकण्यापेक्षा दुग्धजन्य पदार्थांतून अधिक नफा मिळतो. सध्या बाजारपेठेत प्रामुख्याने तूप, लोणी, दूध पावडर, दही, लस्सी, पनीर, खवा यांसारखे अनेक दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध आहेत.
How to prepare rabadi from milk?
How to prepare rabadi from milk?

दूध हे एक प्रकारचे सकस अन्न असून ते त्यातील प्रथिने आणि खनिजे उच्च प्रतीची असतात.  केवळ दूध (milk) विकण्यापेक्षा दुग्धजन्य पदार्थांतून (milk product) अधिक नफा मिळतो. सध्या बाजारपेठेत प्रामुख्याने तूप (ghee), लोणी, दूध पावडर (milk powder), दही (Dahi), लस्सी (Lassi), पनीर (Paneer), खवा (Khoa) यांसारखे अनेक दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध आहेत. हेही वाचा- गुणवत्ता, दर, सेवा-‘त्रिसूत्री’ ठरली यशस्वी रबडी (Rabadi) हा उत्तर भारतातील अतिशय लोकप्रिय असा एक गोडपदार्थ (Sweet product) आहे. रबडी हा बासुंदीसारखाच परंतु काहीसा वेगळा पदार्थ आहे. कढई दूध असेही रबडीला संबोधले जाते. रबडी बनविण्यासाठी शक्यतो म्हशीच्या दुधाचा (Buffalo milk) वापर केला जातो. हेही पाहा- दूध व दुग्धजन्य पदार्थांचे मानवी आहारतील महत्व

रबडी बनविण्यासाठी दूध एका मोठा व्यास असलेल्या उथळ कढईमध्ये घेऊन मंद आचेवर तापवून घ्यावे. दूध गरम करीत असताना दुधावर तयार होणारी साय, कढईच्या वरच्या भागात साठवून ठेवावी. मंद आचेमुळे दूध उतू न जाता सतत हलवत राहील्याने आटत राहते. साधारणपणे दूध आटून मूळ दुधाच्या अर्धे ते एक तृतीयांश झाल्यावर त्यात मूळ दुधाच्या अंदाजे सहा ते सात टक्के इतकी साखर (Sugar) टाकली जाते. वरच्या भागात साचवून ठेवलेली साय गरम कढईमुळे कडक होऊन जाते. ही साय खरडवून, तिचे तुकडे करून ते दुधात टाकावेत.

रबडीचे सेवन करताना दूध पिले जाते परंतु त्यात असलेले सायीचे तुकडे चावावे लागतात. या सायीच्या तुकड्यांना रबरासारखी (Rubber) तन्यता असल्यामुळे, रबर चावल्याची जाणीव होते. हेच रबडीचे वैशिष्ट्य आहे. उत्तर भारतातील काही राज्यात रबडी मातीच्या भांड्यामध्ये दिली जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com